27 C
Mumbai
Monday, August 28, 2023
घरमुंबईठाकरेंच्या दबावामुळे नितीन देसाई यांनी आत्महत्या केली; नितीश राणे यांचा आरोप

ठाकरेंच्या दबावामुळे नितीन देसाई यांनी आत्महत्या केली; नितीश राणे यांचा आरोप

प्रख्यात कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी काही दिवसांपूर्वी स्वत:च्या मालकीच्या एनडी स्टुडीओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलीस चौकशी सुरु आहे. दरम्यान संजय राऊत यांनी सनी देओल आणि नितीन देसाईंबद्दल एक वक्तव्य केले होते. त्यानंतर भाजपचे आमदार नितीश राणे यांनी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्या दबावामुळे नितीन देसाई यांनी आत्महत्या केल्याची माहिती आपल्याकडे असल्याचे विधान केले आहे.

नितीश राणे म्हणाले की, माझ्या माहितीनुसार उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंचा त्याच्यावर दबाव होता होता. त्यांच्यावर जोरजबरदस्ती केली गेली होती. दबाव टाकला गेला होता. माझ्या माहितीनुसार एनडी स्टुडीओ आम्हाला विका अशा धमक्यापण मातोश्रीच्या निगडीत लोकांनी नितीन देसाई आणि या लोकांना दिल्या होत्या. आम्हाला कोणाच्याही मृत्यूवर राजकारण करायचे नाही पण राजाराम राऊत यांना बोलेन की, तु आमचे थोबाड उघडायला लावलेस तर तुझ्या मालकाचे वस्त्रहरण करणार हे पहिल्या दिवसापासून मी तुला सांगितलेले आहे.

राणे म्हणाले एनडी स्टुडीओ बळकावण्याचा प्रयत्न कोण करत होते? तर संजय राजाराम राऊत, त्याचा मालक आणि मालकीन. राऊतांना उद्देशून ते म्हणाले त्याच्याबद्दल थोडंस स्पष्टीकरण महाराष्ट्राला दे कोण त्यांचा मानसिक छळ करत होते, तर तुझा हा उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे त्याबद्दल थोडी माहिती महाराष्ट्राला दे आणि थोबाड उघड
राऊतांना उद्देशुन राणे म्हणाले, तुझी ठाकरे चित्रपटाचे शुटींगचा काही भाग एनडी स्टुडीओत शुट केला. त्याचे पैसे तरी नितीन देसाईंना दिले होते का तु? फुकटमध्ये केलेले सगळे अजूनपर्यंत शुटींगचा चेक दिलेला का त्याचा जरा स्पष्टीकरण दे. गेलेल्या माणसावर राजकारण करणे हेच या सडकछाप संजय राऊत यांची वृत्ती, संस्कार आहेत. स्वत: सगळ फुकट खायचे नितीन देसाई यांच्याकडून आणि नितीन देसाई गेल्यानंतर नितीन देसाईंवर अन्याय केला? मग का तुझा मालक नितीन देसांईंवर दबाव टाकत होता एनडी स्टुडीओसाठी.

हे सुद्धा वाचा 

21 दिवसापेक्षा जास्त दिवस पावसाने ओढ देऊनही राज्यात 98 टक्के क्षेत्रात पेरण्या!

आरोग्य विभागात होणार मेगा भरती, तब्बल इतक्या जागांसाठी होणार भरती

दिवंगत अभिनेता रवींद्र महाजनींबद्दल पहिल्यांदाच बोलला गश्मीर

आता सनी देओल आणि नितीन देसाईची आठवण येते मग तुझ्या मालकाचा मुलगा सत्ता असताना का मराठी कलाकाराला मोठा करायचा नाही. बीएमसीचे अर्धे काँट्रॅक्ट महाविकास आघाडी असताना का डीनो मोरियाला द्यायचे तेव्हा का नितीन देसाई आठवला नाही, तेव्हा का मराठी कलाकार आठवला नाही. संध्याकाळी सात नंतर तुम्हाला डीनो लागतो आणि सत्ता गेल्यानंतर तुम्हाला नितीन देसाई लागतात, असा सवाल राणे यांनी संजय राऊत यांना केला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी