30 C
Mumbai
Tuesday, August 29, 2023
घरव्यापार-पैसायंदा देशात राखीच्या विक्रीत होणार एवढी मोठी उलाढाल!

यंदा देशात राखीच्या विक्रीत होणार एवढी मोठी उलाढाल!

रक्षाबंधनाला केवळ एक दिवस उरलेला असताना यंदा देशभरात तब्ब्ल दहा हजार कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. यंदा बाजारात राख्यासह भेटवस्तूंच्या विक्रीचीही उलाढाल मोठी झाली आहे. बरेच लोक पारंपरीक राखीला पसंती देत आहेत. वेगवेगळ्या भेटवस्तू खरेदीला लोक प्राधान्य देत आहेत.

फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे अध्यक्ष बी.सी. भरतीया यांच्या माहितीनुसार यंदा रक्षाबंधनाच्या निमित्ताने तब्बल दहा हजार कोटींची आर्थिक उलाढाल झाली आहे. त्याअगोदरच्या वर्षात ७ हजार कोटींचा व्यवहार झाला होता. यंदाच्या वर्षात रक्षाबंधन जास्त धुमधडाक्यात होणार आहे. २०२१ साली रक्षाबंधनाच्या दिवशी बाजारात ६ हजार कोटी रुपयांची उलाढाल झाली होती. कोरोना काळात २०२० मध्ये ५ हजार कोटी, २०१९ मध्ये ३ हजार ५०० आणि २०१९ मध्ये ३ हजार ५०० कोटी रुपयांचा व्यवहार झाला होता. यानुसार, वर्षानुवर्षे राखी उद्योगामध्ये कोटींची उलाढाल होऊन दरवर्षी उत्पन्नाचा आकडा वाढतच आहे.

हे ही वाचा

नीरजच्या सुवर्ण कामगिरीवर आनंद महिंद्राची ट्विटर पोस्ट चर्चेत

बांधकाम मजुराची पोरगी गाजवतेय लावणीचा महामंच

डिंपल क्वीन प्रीती झिंटानं जवळच्या व्यक्तीला गमावलं… इंस्टाग्रामवर भावुक पोस्ट

धर्मेंद्र यांच्या किसिंग सीनवर लेक ईशा देओलची प्रतिक्रिया

यंदा बाजारात विविध प्रकारच्या राख्या उपलब्ध असल्या तरीही मागणी मात्र पारंपारिक रेशीम राखीलाच असल्याची माहिती राखी विक्रेत्यांनी दिली. पारंपरिक रेशीम राखीसह नागपूर मध्ये बनलेली खादी राखी, जयपूरची सांगानेरी कला राखी, देशातील विविध आदिवासी भागातून बांबूच्या लाकडापासून बनवलेल्या राख्यादेखील बाजारात उपलब्ध आहेत. मुंबईत इतर राज्यातून आलेल्या तीस रुपयांहून महाग राख्यांना फार महत्व आहे.

राखी सह भाऊ बहीण एकमेकांना भेटवस्तूही देतात. वेगवेगळ्या आकाराची घाऊक किमतीतील चॉकलेट, कपडे, खड्यांचे दागिने, मोबाईलशी संबंधित उपकरणे बाजारात जास्त विकली जात आहेत. बुधवारपर्यंत भेटवस्तूंची खरेदी जोमाने सुरू राहील, अशी आशा व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी