30 C
Mumbai
Wednesday, May 15, 2024
HomeमुंबईNitin Gadkari : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी 'सरां'च्या भेटीला, माजी मुख्यमंत्री मनोहर...

Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ‘सरां’च्या भेटीला, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींना केला वाकून ‘नमस्कार’

टीम लय भारी

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी हे पक्षातर्फे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. राजकीय वर्तुळात मनोहर जोशींना प्रेम आणि आदराने ‘सर’ असे संबोधले जाते. राजकारणाच्या मुख्य प्रवाहातून मनोहर जोशी वयोमानापरत्वे दूर झाले असले, तरी आजही दिग्गज नेत्यांशी त्यांचे घट्ट नाते आहे. मनोहर जोशी यांच्या मुंबईतील निवासस्थानी नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी गडकरींनी मनोहर जोशींच्या पाया पडून आशीर्वाद घेतले.

मनोहर जोशी हे १९९५ ते १९९९ या काळात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होते. जोशींच्या कार्यकाळात शिवसेना-भाजप युती सरकारमध्ये नितीन गडकरी यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाची धुरा होती. पीडब्ल्यूडी मंत्री म्हणून मुंबई-पुणे महामार्गाच्या विकासात नितीन गडकरी यांचा महत्त्वाचा वाटा मानला जातो. या भेटीच्या निमित्ताने गडकरी-जोशींनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.

दरम्यान, केंद्रात ‘हेवीवेट’ मंत्रालयाची जबाबदारी सांभाळणारे भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी  यांच्या मनात आजही ‘आपल्या मुख्यमंत्र्यां’विषयी स्नेह आहे. केंद्रीय रस्ते आणि महामार्ग विकास मंत्री नितीनजी गडकरी यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी (Manohar Joshi) यांची मुंबईत भेट घेत ऋणानुबंध कायम असल्याचं दाखवलं. भाजप आणि शिवसेना या दोन पक्षांमध्ये वितुष्ट आले असले, तरी दोन्ही पक्षातील दिग्गज नेते राजकारणापलिकडची नाती जपताना दिसत आहेत.

१९ मनोहर जोशी हे ६८ मध्ये सर्वप्रथम दादरमधून मुंबई महापालिकेत नगरसेवकपदी निवडून आले. मनोहर जोशी हे १९९५ ते १९९९ या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. २००२-२००४ या काळात जोशींनी लोकसभा अध्यक्ष म्हणून काम पाहिले. त्यानंतर मुंबईचे महापौर, विधानपरिषद, विधानसभा आमदार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद, लोकसभा खासदार, केंद्रीय मंत्रिपद, लोकसभा अध्यक्ष, राज्यसभा अशी त्यांची राजकीय कारकीर्द बहरली. ते शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री तर ठरलेच, पण राज्याचे पहिले बिगर-काँग्रेसी मुख्यमंत्रीही ठरले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी