30 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeमुंबईमुंबईत पाचशेच्या बनावट नोटा, पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या !

मुंबईत पाचशेच्या बनावट नोटा, पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या !

भारतामध्ये बनावट नोटा सरकारसाठी एक मोठं आव्हानच आहे. या समस्येपासून सुटका करण्यासाठी सरकारने सात वर्षांपुर्वी देशात नोटबंदी केली होती. तरीही बनावट नोटा बनवायच्या प्रक्रियेला आळा बसलेला नाही. बनावट नोटा बनवण्याची अशीच एक घटना मुंबई मधील मालाड पश्चिमेतील, मालवण परिसरात घडली असून भारतीय चलनाच्या बनावट नोटा बनवून विक्री करणाऱ्या आरोपीला मालवणी पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. उमेश जयकिशन कुमार (वय 32) असे आरोपीचे नाव असून तो मुळचा फरीदाबाद , हरियाणा येथील रहिवासी आहे. सध्या तो मुंबईमध्ये कांदिवली येथील पश्चिम, जनकल्याण नगरमध्ये राहत होता.

काही दिवसांपूर्वी सहाय्यक पोलीस निरीक्षक हसन मुलाणी यांना मुंबईमध्ये एक व्यक्ति हा भारतीय चलनाच्या बनावट नोटा विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. तेव्हा रात्रपाळी कार्यरत असणाऱ्या पोलीस निरीक्षक शेळके आणि हसन मुलाणी हे  त्याच्या पोलीस पथकासह गणेश मंदिराजवळ, गेट नंबर 1 मालवणी येथे साध्या वेषात सापळा रचून आरोपीची वाट पाहता होते. रात्री 10 च्या सुमारास आरोपी उमेश कुमार हातात प्लॅास्टिकच्या काळ्या पिशवी सोबत एक लहान मुलाला घेऊन आला होता. त्याच्या हालचाली संशयास्पद होत्या त्यावेळी पोलीस पथकाने घेराव घालत त्याला ताब्यात घेतले. आरोपीची झडती घेतली असता त्याच्याकडे 500 रु च्या एकूण 8 बनावट नोटा, मोबाईल फोन, भारतीय चालनातील 3000 रु अशी मालमत्ता मिळाली असून पोलिसांनी आरोपी उमेश कुमारला ताब्यात घेतले आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे सुध्दा वाचा:

भाजपविरोधात विरोधकांची एकजूट; पाटण्यातील बैठकीत काय म्हणाले पवार-ठाकरे ?

रेशनिंग दुकानांमध्ये मिळणार बँकांच्या सुविधा, मंत्री रवींद्र चव्हाण यांचा गोरगरीबांसाठी मोठा निर्णय !

शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता त्यातच निवडणूक आयोगाच्या नोटीसांमुळे मुख्याध्यापक त्रस्त

पुढील तपासामध्ये आरोपी उमेश याच्या घराची झडती घेतली असता. त्याच्या राहत्या घरात लॅपटॉप, अॅपल कंपनीचा आयपॉड, 2 पेनड्राईव्ह, 4 मोबाईल,कोरे बॉन्ड पेपर रिम, मायक्रो कार्ड तसेच बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये महिंद्रा एक्सयुव्हि 500 आणि एक कलर प्रिंटर मिळाला आहे, हे सर्व साहित्य पोलिसांकडून जप्त करण्यात आले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी