33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमुंबई'आरपीएफ'च्या व्हॉट्सॲप ग्रुपने महिला प्रवाशांचा प्रवास झाला सुरक्षित

‘आरपीएफ’च्या व्हॉट्सॲप ग्रुपने महिला प्रवाशांचा प्रवास झाला सुरक्षित

रेल्वे लोकल प्रवास तोही दिवसा करणे भितीदायक झाले आहे. जून महिन्यात लोकलने प्रवास करणाऱ्या महिलांवर अत्याचार करण्याचा प्रयत्न झाला. मुंबईसारख्या सुरक्षित शहरात या घटना घडल्याने रेल्वे प्रोटेक्शन फोर्स अर्थात आर पी एफच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. याची दखल घेऊन आरपीएफने आता महिला प्रवाशांच्या डब्यात महिला पोलिसांचा बंदोबस्त वाढवला आहे. या महिला पोलीस नियमित महिला डब्यात प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा मोबाईल नंबर घेत आहेत. त्यातून महिला पोलिसांनी व्हॉट्स ॲपचे ग्रुप तयार केले आहेत. महिला प्रवासी त्यांना प्रवासात भेडसावणाऱ्या समस्या या ग्रुपवर मेसेज करत आहेत. आणि त्यांच्या समस्यांची सोडवणूक आरपीएफ करत आहेत. या व्हॉट्सॲप ग्रुपने महिला प्रवाशांचा प्रवास सुरक्षित झाला आहे.

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी. देशभरातून नागरिक या मायानगरीमध्ये नशीब उजळवण्यासाठी येत असतात. शहरी भागात राहणाऱ्या महिला कुटुंबाचा गाडा हाकण्यासाठी नोकरी करतात. पण गेल्या काही वर्षात एकट्या महिलेने त्यांच्याच डब्यात प्रवास करणे जिकीरीचे झाले आहे. सकाळी लोकलने प्रवास करणाऱ्या महिलांवर अत्याचार करण्यात आल्याच्या घटना गेल्या महिन्यात मुंबईत घडल्या आहेत. यापूर्वीही महिला प्रवासी डब्यात संडास करणे, गर्दूल्ले मंडळींचा वावर वाढला होता. प्रवासी संघटनेच्या पदाधिकारी लता आरकडे यांनी रेल्वे पोलिस आणि प्रवासी संघटना यांच्याबरोबर झालेल्या एका बैठकीत लोकलच्या महिला डब्यात महिला सुरक्षित नसतात असा मुद्दा मांडला होता. मध्य रेल्वेचे विभागीय वरिष्ठ सुरक्षा आयुक्त ऋषी शुक्ला यांनी रेल्वे सुरक्षा बल (आर. पी. एफ ) च्या कर्मचाऱ्यांना, विशेषतः महिला डब्यात सुरक्षा देणाऱ्या महिला पोलिसांना व्हॉट्सॲप ग्रुप बनवायला सांगितला होता. त्यानुसार अनेक गाड्यांमध्ये प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांचे आर. पी. एफने ग्रुप बनवले.
हे सुद्धा वाचा
फडणवीस आता संभाजी भिडेला फाशी देणार का?, भिडेविरोधात काँग्रेसचा राज्यभर आक्रोश
केसरकर शिक्षणमंत्री असून किती अशिक्षित आहात; काँग्रेस नेत्याचा हल्लाबोल
३३ कोटी वृक्ष लागवड; जयंत पाटलांच्या निशाण्यावर वनमंत्री मुनगंटीवार

प्रवासी पासमध्ये रेल्वे प्रशासन सुरक्षा अधिभार घेते. त्यानुसार महिलांच्या डब्यात सायंकाळपासून सकाळपर्यन्त महिला पोलिस कार्यरत असतात. महिलांच्या डब्यात गर्दूल्ले ठाण मांडून असतात. महिला डब्याजवळ असणाऱ्या पुरुषांच्या डब्यातून काही प्रवासी महिलांची छेड काढतात. या आणि अशा सारख्या अनेक समस्यांची माहिती महिला प्रवाशांनी या व्हॉट्सॲप ग्रुपवर टाकल्याने आर. पी. एफ. ने अशा मंडळींना चांगलाच प्रसाद देत अद्दल घडवली आहे, अशी माहिती आर. पी. एफच्या वरिष्ठ पोलिस सूत्रांनी दिली.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी