30 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
HomeमुंबईSalman Khan Murder Planning : सलमानच्या हत्येचा कट लॉरेन्स बिश्नोई टोळीचा प्लान...

Salman Khan Murder Planning : सलमानच्या हत्येचा कट लॉरेन्स बिश्नोई टोळीचा प्लान ‘बी’ होता

पोलिसांच्या दिलेल्या माहितीनुसार, कपिल पंडीत, संतोष जाधव, दीपक मुंडी आणि इतर दोन हस्तकांनी सलमान खानच्या मालकीच्या फार्महाऊस जवळ घर भाडयाने घेतले होते. सलमान खानची संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी त्यांनी त्या घरात जवळपास दीड महिने मुक्काम केला होता.

हिंदी चित्रपट अभिनेता (Hindi Film Industry) सलमान खान (Salman Khan) हा कुख्यात लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या हीटलिस्टवर असल्याची बातमी पोलिस तपासामधून निष्पन्न झाली आहे. लॉरेन्स बिश्नोई टोळीने (Lawrence Bishnoi Gang) सलमान खानची हत्या त्याच्या पनवेल येथील फार्महाऊसच्या परिसरात करण्याचे नियोजन केले होते. सलमान खानचे वडील आणि हींदी चित्रपट सृष्टीचे प्रसिद्ध लेखक सलीम खान यांना जूनमध्ये ते वास्तव्यास असलेल्या वांद्रे – बॅण्डस्टॅण्ड परिसरात (Bandstand) एक धमकीवजा पत्र भेटले. ज्यामध्ये असे नमूद केले होते की, पंजाबी गायक सिधू मूसावालाप्रमाणे (Sidhu Moosewala Murder) सलीम खान आणि सलमान खान यांची हत्या केली जाईल. सिधू मूसावालाची हत्या पंजाबमधील मानस‍ा जिल्हयात मे महिन्यात लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून करण्यात आली होती.

पंजाब पोलिसांकडून अशी माहिती देण्यात आली की, सिधू मूसावाला याची हत्या घडवून आणण्यापूर्वी लॉरेन्स बिश्नोई टोळीने सलमान खानची हत्या करण्याचा कट रचला होता. या योजनेची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी कॅनडा स्थित गँगस्टर गोल्डी ब्रार आणि लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य कपिल पंडीत यांच्यावर सोपविण्यात आली होती परंतु काही दिवसांपूर्वी कपिल पंडीतला भारत-नेपाल आंतरराष्ट्रीय सीमेवर अटक करण्यात आल्यामुळे सलमान खानच्या हत्येचा कट उधळण्यास पोलिस यंत्रणानां यश आले.

कोणत्या प्रकारे सलमान खानची हत्या करण्याची योजना आखली गेली –

पोलिसांच्या दिलेल्या माहितीनुसार, कपिल पंडीत, संतोष जाधव, दीपक मुंडी आणि इतर दोन हस्तकांनी सलमान खानच्या मालकीच्या फार्महाऊस जवळ घर भाडयाने घेतले होते. सलमान खानची संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी त्यांनी त्या घरात जवळपास दीड महिने मुक्काम केला होता. हया सर्व हस्तकांना सलमान खानची हत्या करण्यासाठी प्रत्येकी एक पिस्तूल देण्यात आली होती.

या हस्तकांनी ही सुद्धा माहिती मिळवली होती की, सलमान खान हीट अँड रन प्रकरणात चर्चेत आल्यापासून त्यांनी त्याच्या वाहन चालकाला गाडी धीम्या गतीने चालवण्याच्या सूचना दिल्या होत्या. अनेकवेळा सलमान खानचा खाजगी अंगरक्षक शेरा सुद्धा त्याच्याबरोबर पनवेल येथील फार्महाऊसला भेट देत असे. इतकेच नव्हे तर या हस्तकांनी सलमान खानच्या फार्महाऊस बाहेर असलेल्या खडडयांची सुद्धा मोजणी केली होती कारण त्या खडडयांमुळे वाहनांची गती मंदावते जेणेकरून सलमान खानवर हल्ला करण्यात मदत होईल याची त्यांना जाणीव होती.

हे सुद्धा वाचा –

UP Dalit Sisters Murder : उत्तर प्रदेशमध्ये दलित बहिणींच्या बलात्कार आणि हत्येप्रकरणी 6 जणांना अटक

Robin Uthappa Retires : रॉबिन उथप्पाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही प्रकारातून स्वीकारली निवृत्ती

Eknath Shinde : मोठी बातमी : एकनाथ शिंदेंचा मुंबईकरांसाठी मोठा निर्णय !

सलमान खानबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी त्यांनी स्वत:ला सलमान खानचे चाहते असल्याचे भासवत फार्महाऊसवर तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांशी मैत्री करण्याचा प्रयत्न केला. सलमान खानवर हल्ला करण्याच्या उद्देशाने या हस्तकांनी दोन वेळा फार्महाऊसला भेट दिली होती आणि खानची हत्या करण्याचा सापळा रचला परंतु, दोन्ही वेळा त्यांना अपयश आले.

सलमान खानला खाजगी शस्त्र बाळगण्याचा परवाना मिळाला –

सलमान खानने यांनी त्यांना ठार मारण्याचे धमकीवजा पत्र मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांकडे खाजगी शस्त्र बाळगण्याची परवानगी मिळविण्यासाठी अर्ज केला होता. या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुंबई पोलिसांच्या ‘झोन 9’ च्या पोलिस उपायुक्तांनी सलमान खानला ऑगस्ट महिन्यामध्ये खाजगी शस्त्र बाळगण्याची परवानगी दिली.

अश्विन शेश्वरे
अश्विन शेश्वरेhttp://laybhari.in
He writes about National and Maharashtra Politics, Education, Health, Civic, Legal, Crime and Sports beat for LayBhari News.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी