31 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeमुंबईपुढचे ३-४ दिवस लोकल १५ मिनिटे उशिरा धावणार

पुढचे ३-४ दिवस लोकल १५ मिनिटे उशिरा धावणार

टीम लय भारी

मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने ठाणे ते दिवा विभागातील पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या महत्त्वाच्या कामासाठी २ जानेवारीच्या पहाटेपासून ३ जानेवारीच्या पहाटेपर्यंत २४ तासांचा मेगाब्लॉक घेतला होता.(The next 3-4 days the local will run 15 minutes late)

आता हे काम पूर्ण झालं आहे. मात्र तरीही गाड्यांच्या वेगावर काही निर्बंध घालण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे. त्यामुळे पुढचे तीन चार दिवस ह्या गाड्या १५-२० मिनिटे उशिरा धावतील.

मुंबईत 9 लाख मुला मुलींच्या लसीकरणासाठी पालिका सज्ज, लसीकरण केंद्राची यादी एका क्लिकवर

विद्यापीठांमध्ये नवीन वर्षाचे निर्बंध, पुन्हा लॉकडाऊन.. ?

मध्य रेल्वेची जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे. आपल्या ट्वीटमध्ये सुतार म्हणतात,”ठाणे दिवा स्लो लाइनवरच्या २४ तासांच्या मेगाब्लॉकनंतर, सुरक्षेसाठी पुढील तीन चार दिवस गाड्यांच्या वेगावर निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे पुढचे तीन चार दिवस गाड्या १५ ते २० मिनिटे उशिरा धावणार आहे. शक्य तितक्या लवकर हे निर्बंध दूर केले जातील”.

  मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने ठाणे ते दिवा विभागातील पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या महत्त्वाच्या कामासाठी २ जानेवारीच्या पहाटेपासून ३ जानेवारीच्या पहाटेपर्यंत २४ तासांचा मेगाब्लॉक घेतला होता. त्यामुळे ठाणे ते कल्याण या मुंबईकडे जाणाऱ्या तसंच डाऊन म्हणजे कल्याणकडे जाणाऱ्या मार्गावरील लोकस बंद होत्या. ज्या सुरू होत्या त्या जलद मार्गावरुन वळवण्यात आल्या होत्या. याच काळात कळवा. मुंब्रा, दिवा, कोपर आणि ठाकुर्ली या स्थानकांवर लोकल थांबणार नसल्याचं रेल्वेने जाहीर केलं होतं.

लवकरच, प्रवाशांना मुंबई लोकल ट्रेनमध्ये चित्रपट, संगीताचा आनंद मोफत घेता येणार

14 Outstation Trains Cancelled as Indian Railways to Hold 24 Hours Mega Block Today; Check Mumbai Local Train Details

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी