31 C
Mumbai
Wednesday, May 22, 2024
Homeमुंबईमंत्रालयातील हा ‘फोटो’ सांगतोय; तुम्ही कितीही मोठे असाल, पण खूर्ची गेली की...

मंत्रालयातील हा ‘फोटो’ सांगतोय; तुम्ही कितीही मोठे असाल, पण खूर्ची गेली की शान आणि दराराही जातो

टीम लय भारी

मुंबई : मंत्रालयातील लगबगीचा दिवस. एक व्यक्ती विस्तारीत इमारतीमध्ये जिन्याच्या पायऱ्या चढत होती. त्यांच्यासोबत कुणीही नव्हते. बिचारे एकटेच चालले होते. कुणाचेच त्यांच्याकडे लक्ष नव्हते. अन्य सामान्य लोकांसारखीच ही व्यक्ती सुद्धा दुर्लक्षित होती. मंत्रालयाच्या व्हरांड्यात घुटमळणारे एक कक्ष अधिकारी कुजबुजले, ‘यांना कुठे तरी पाहिलेय’. त्यावर दुसरा कक्ष अधिकारी म्हणाला, ‘अहो हे तर राज्याचे माजी मुख्य सचिव.’ दोघांचेही डोळे विस्फारतात. दहा वर्षांपूर्वी मंत्रालयात व राज्याच्या संपूर्ण प्रशासनात दरारा असलेल्या या व्यक्तीला त्यांनी पाहिले होते. आता मात्र या व्यक्तीला सामान्य माणसाच्या वेशात पाहून हे दोन्ही कक्ष अधिकारी काहीसे हेलावूनही गेले.

मंत्रालयातील हा ‘फोटो’ सांगतोय; तुम्ही कितीही मोठे असाल, पण खूर्ची गेली की शान आणि दराराही जातो

मंत्रालयात आगंतुकपणे आलेल्या त्या माजी सचिवांचे नाव आहे, जॉनी जोसेफ. सन २००७ ते २००९ या काळात ते राज्याचे मुख्य सचिव होते. म्हणजे राज्यातील सगळ्या प्रशासनाचे बॉस. त्या अगोदर मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. मुंबई महापालिका आयुक्त म्हणून सुद्धा ते कार्यरत होते. आपल्या प्रभावी कार्यशैलीमुळे प्रशासनात त्यांचा दरारा, दबदबा आणि आदर होता. सन २००९ मध्ये निवृत्त झाल्यानंतर ते काही काळ उपलोकायुक्त म्हणून कार्यरत होते.

मंत्रालयातील हा ‘फोटो’ सांगतोय; तुम्ही कितीही मोठे असाल, पण खूर्ची गेली की शान आणि दराराही जातो

मुख्य सचिव पदावर कार्यरत असलेल्या सनदी अधिकाऱ्याचा दरारा, मान मरातब मुख्यमंत्र्यांपेक्षा काही कमी नसते. दिमतीला गाड्या, बंगले, नोकर चाकर अशा सुविधा असतात. मुख्य सचिव आपल्या दालनातून बाहेर पडणार म्हटले की, लिफ्टमन साहेबांसाठी लिफ्ट थांबवून ठेवतो. दोन – दोन शिपाई मागे पुढे असतात. लिफ्टमधून खाली येताच ड्रायव्हरने गाडी अगोदरच लावलेली असते. शिपाई गाडीचा दरवाजा उघडतात. मुख्य सचिव गाडीत बसतात आणि गाडी भुर्रकन निघून जाते. हा असतो मुख्य सचिवांचा दरारा. मंत्रालयातील सगळे सचिव, राज्यातील सगळे आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त यांना मुख्य सचिवाच्या आदेशानुसार वागावे लागते.

मुख्य सचिवांना भेटण्यासाठी टाटा, अंबानी यांच्यासारख्या उद्योगपतींपासून ते परदेशी शिष्टमंडळापर्यंत सर्वजनच आतुरलेले असतात. मुख्यमंत्र्यांनाही मुख्य सचिवांना विश्वासात घेऊनच निर्णयांची अंमलबजावणी करावी लागते. अशा या राजेशाही थाट असलेल्या पदावर जॉनी जोसेफ यांनी काम केले होते. सन २००९ मध्ये ते निवृत्त झाले. त्यानंतर तब्बल १० वर्षानंतर ते मंत्रालयात दिसले. वयोमानानुसार झुकलेली मान, मागे पुढे नसलेले नोकरचाकर अशा अवस्थेत पाहायला मंत्रालयातील त्या कक्ष अधिकाऱ्यांच्या डोळ्यांचीही तयारी नव्हती.

मंत्रालयातील हा ‘फोटो’ सांगतोय; तुम्ही कितीही मोठे असाल, पण खूर्ची गेली की शान आणि दराराही जातो
जाहिरात

जोसेफ यांची ही मंत्रालयवारी सगळ्याच सनदी अधिकाऱ्यांसाठी (व अन्य उच्चपदस्थांसाठी सुद्धा) बरेच काही शिकवून जाणारी होती. नशिबाने मिळालेले अधिकार कायम राहात नसतात. जोपर्यंत आपण खूर्चीत असतो, तोपर्यंत लोक आपल्याला ओळखतात. खूर्ची गेली की कोणीच ओळखत नाही. खूर्चीने दिलेले अधिकार ओरबाडावेत, मिरवावेत की निस्वार्थीपणे सामान्य लोकांसाठी त्याचा वापर करावा याचेही आत्मपरिक्षण करायला लावणारा हा प्रसंग होता. शरीरयष्टीतील बदलामुळे जॉनी जोसेफ यांना अनेकांनी ओळखले नाही. पण त्यांच्या नावाचा दबदबा मात्र अजूनही कायम असल्याचे या दोन कक्ष अधिकाऱ्यांच्या बोलण्यातून ठळकपणे दिसले.

हे सुद्धा वाचा

देवेंद्र फडणवीस यांच्या डोक्यावर तुकाराम मुंढे, एकूण २० सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुख्यमंत्र्यांनी तहसिलदारांना खूर्चीत बसविले, अन् त्यांच्यासोबत फोटो काढला; तहसिलदार म्हणाले, हा अविस्मरणीय क्षण

आयुक्त प्रवीण परदेशींच्या पीएच्या पत्नीकडूनही ‘वाडिया’ने उकळले महागडे शुल्क

अजितदादांच्या कार्यालयात बारामतीच्या अधिकाऱ्याची नियुक्ती

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी