27.9 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeराजकीयराज ठाकरेंच्या हिंदुत्ववादी भूमिकेचे चंद्रकांतदादा पाटलांनी केले कौतुक

राज ठाकरेंच्या हिंदुत्ववादी भूमिकेचे चंद्रकांतदादा पाटलांनी केले कौतुक

टीम लय भारी

पुणे : राज ठाकरे यांनी हिंदुत्ववादाचा पुरस्कार करणे ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. देशात परिवर्तन करण्यासाठी हिंदुत्वाचा पुरस्कार करणे यात काहीही गैर नाही, अशा शब्दांत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे कौतुक केले आहे.

राज ठाकरे यांनी गेल्या आठवड्यात मनसेचे महाअधिवेशन आयोजित केले होते. या अधिवेशनात त्यांनी नव्याने भगव्या ध्वजाचे अनावरण केले, तसेच हिंदु विचारधारेची नवी घोषणा केली. राज ठाकरेंच्या या नव्या भूमिकेबद्दल राजकीय व सामाजिक क्षेत्रात उलटसुलट चर्चा रंगली आहे. परंतु राज यांचे हे नवे धोरण भाजपशी सुसंगत आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनीही राज यांच्या या भूमिकेचे स्वागत केले आहे.

राज ठाकरेंच्या हिंदुत्ववादी भूमिकेचे चंद्रकांतदादा पाटलांनी केले कौतुक
जाहिरात

पुण्यात पत्रकारांशी बोलताना चंद्रकांतदादांनी या भावना व्यक्त केल्या आहेत. यावेळी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवरही चंद्रकांतदादांनी हल्लाबोल केला. महाविकास आघाडीचे नेते दररोज नवनवे विषय काढतात, आणि त्यावर कल्पनाविलास करतात. फोन टॅपिंग प्रकरण, कोरेगाव भीमा प्रकरणाचा एनआयएकडे दिलेला तपास, छत्रपती शिवाजी स्मारकावर कॅगने ठेवलेला ठपका असे तकलादू विषय काढून राज्य सरकार आरोप करीत आहे. सत्ताधाऱ्यांनी असे आरोप करण्यापेक्षा चौकशी करावी, असे आव्हानही त्यांनी दिले.

फोन टॅपिंगच्या मुद्द्यावरून त्यांनी मागील सरकारमधील शिवसेनेचे गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्यावरही निशाणा साधला. फोन टॅपिंगसारखे निर्णय फडणवीस सरकारने घेतले असते तर गृहखात्याने दीपक केसरकर यांना ही माहिती दिलीच असती. पण केसरकर सुद्धा या मुद्द्यावर सोयीस्कर भूमिका घेत असल्याचा आरोप चंद्रकांतदादांनी केला.

हे सुद्धा वाचा

Sunday Special : राज ठाकरे यांच्या नव्या भूमिकेचा अर्थ

राज ठाकरेंची नवी गर्जना : हिंदूना नख लावाल, तर हिंदू म्हणून अंगावर जाईन

अयोध्या निकाल ऐकायला बाळासाहेब असायला हवे होते : राज ठाकरे

मनसेच्या नेतेपदी अमित ठाकरे यांची नियुक्ती, मनसेच्या नवा झेंड्याचेही अनावरण

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी