30 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeमुंबईधक्कादायक! मुंबईतील वरळी सी-फेसवर गोणीत आढळला तरुणीचा मृतदेह

धक्कादायक! मुंबईतील वरळी सी-फेसवर गोणीत आढळला तरुणीचा मृतदेह

महाराष्ट्रात गुन्हेगारीचे प्रमाण सध्या वाढत चालले आहे. मुंबईत काळजाचा थरकाप उडवणारी एक बातमी समोर आली आहे. मुंबईतील वरळी सी- फेसवर एका अज्ञात तरुणीचा मृतदेह आढळल्याने शहरात खळबळ उडाली आहे. एका गोणीत तरुणीचा मृतदेह हात- पाय तुटलेल्या अवस्थेत आढळून आला असून वरळी पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांना या गोष्टीची माहिती मिळताच त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे.

वरळी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरळीत एका तरुणीचा मृतदेह आढळला असून तो गोणीत भरलेला होता. मृत तरुणीचं वय 18 ते 30 वर्षांच्या दरम्यान असून आम्हाला याची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी दाखल झालो होतो. यानंतर आम्ही मृतदेह ताब्यात घेतला. यावेळी पाहणी केली असता तरुणीचे हात आणि पाय मोडले असल्याचं आमच्या लक्षात आलं. आम्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पुढील तपास सध्या सुरु असून तरुणीचीही ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरु आहे.

हे सुध्दा वाचा:

मुख्यमंत्री नागपूर दौरा अर्धवट सोडून परतल्याने भाजपवरील नाराजीची जोरदार चर्चा

पदभार सोडताच विभागीय आयुक्त निघाले पायी, साधेपणाचे सर्वत्र कौतुक

राहुलची कर्तबगारी चीनी दाम्पत्याला आवडली, संगमनेरमध्ये मुलीचे केले कन्यादान

काही दिवसांपूर्वी मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये एका तरुणीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. तर त्यानंतर काही दिवसांनीचं चर्नी रोड ते चर्चगेट स्थानकादरम्यान लोकलमध्ये एका महिलेचा अज्ञाताकडून विनयभंग करण्यात आला होता. मिरारोड येथे सरस्वती वैद्य या महिलेची निर्घुण हत्या केली होती. सातत्याने घडत असलेल्या या घटनांमुळे मुंबईत तरुणी-महिला खरंच सुरक्षित आहेत का? असा प्रश्न उपस्थित होतोय.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी