30 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeमुंबईयाकूब मेमनच्या कबरीचे सुशोभीकरण वाईटच, पण नथूराम गोडसे....

याकूब मेमनच्या कबरीचे सुशोभीकरण वाईटच, पण नथूराम गोडसे….

मुंबई बॉम्ब स्फोटातील प्रमुख आरोपींपैकी एक असलेला टायगर मेमनचा भाऊ याकूब मेमनच्या कबरीच्या सुशोभीकरणावरुन एक नवीन वाद उफाळून आला आहे. त्यामुळे सोशल मीड‍ियावर जोरदार प्रतिक्रीया उमटत आहेत.

मुंबई बॉम्ब स्फोटातील प्रमुख आरोपींपैकी एक असलेला टायगर मेमनचा भाऊ याकूब मेमनच्या कबरीच्या सुशोभीकरणावरुन एक नवीन वाद उफाळून आला आहे. त्यामुळे सोशल मीड‍ियावर जोरदार प्रतिक्रीया उमटत आहेत. अनेक नेते मंडळींनी देखील याला विरोध केला आहे. कारण तो अतिरेकी होता. अतिरेक्याची कबर कशी असू शकते हाच पहिला एक गंभीर प्रश्न आहे. परंतु डॉ. विनय काटे नावाच्या एका व्यक्तीने सोशल मीडियावर एक नवा वाद उपस्थित केलाय ते म्हणतात, की अत‍िरेकी याकूब मेमनच्या कबरीचे त्याच्या कुटुंबीयांनी सुशोभीकरण करणे वाईटच आहे. परंतु महात्मा गांधीजींचा खुन करणाऱ्या नथुराम गोडसे यांच्या अस्थी चांदीच्या कलशात ठेवल्या आहेत. त्यांचे कपडे 73 वर्षे झाली तरी पुण्यात आहेत. त्यांच्या विषयी अनेकांना अजून आदराची भावना आहे. असा त्या पोस्टचा मतीतार्थ आहे.

ते म्हणतात की, लोक तिथे गोडसेकडून प्रेरणा घ्यायला जातात. नाटके लिहितात. गांधीचे पुतळे बनवतात. आजही त्या पुतळयाला गोळया घालतात. सांगायचे तात्पर्य असे की, इतके वर्षे झाली तरी नथुराम गोडसेंचे गुणगाण गाणारे लोक आपल्या देशात आहेत. त्यांनी नथूराम गोडसेला स्वतंत्र भारतातला पहिला अतिरेकी असे म्हटले आहे. या पोस्टवरुन देखील सोशल मीडियावर मोठा वादंग निर्माण होणार आहे.

हे सुद्धा वाचा

Election : आता रंगणार 1,166 ग्रामपंचायत निवडणुकांचा रणसंग्राम

Rajesh Tope Vs Tanaji Sawant : राजेश टोपे यांच्यामुळे तानाजी सावंतांची पंचाईत

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळात अतिरेक्याची समाधी…

गणेशोत्सवाचा काळ सुरू आहे. महाराष्ट्रातले पक्षीय राजकारण एका वेगळया वळणावर असतांना हा वादग्रस्त मुद्दा ऐरणीवर आला आहे. हा मुद्दा गंभीर आहे. या विषयावर सरकारने विचार मंथन करायला पाहिजे. खरे तर याकूब मेमनची कबर बांधली गेली. त्यावेळीच तत्कालिन सरकार आणि मुंबई महानगर पालिकेचे डोळे उघडायला हवे होते. शिवाय एका अतिरेक्याच्या कबरीला परवानगी मिळाली कशी हा देखील गंभीर प्रश्न आहे. हा धर्माचा मुद्दा नसून देशाच्या सुरक्षेसंबंधीत प्रश्न आहे. हा देशद्रोहाचा प्रश्न आहे. मुळात त्याची कबर बांधणे चुकीचेच होते.

तो अतिरेकी होता. त्याचे दफन करण्याची गरज नव्हती. दफन करायचे असेल तर एनओसी घ्यायची असते. ती का घेतली नाही. ती एक खासगी संस्था आहे. त्याचा पालिकेशी संबंध नाही. एका‍ अतिरेक्याला एवढा सन्मान का दिला जातो. असा सवाल अदित्य ठाकरेंनी विचार केला. याकूब मेमनच्या कबरीवर कब्रस्तानमधील लाईटमधून वीज पुरवठा केला जात आहे. इतकेच नव्हे त्याला त्याच्या कबरीचे रक्षण करण्यासाठी एक पहारेकरी ठेवला आहे.

याकूब मेमनची कबर बडा कब्रस्तानची जागा ही वक्व बोर्डाच्या अखत्यारीत येते. ज्या भूमीमध्ये टायगर मेमनने बॉम्बस्फाेट घडवून आणले त्याच भूमीवर त्याची कबर बांधली गेली. त्याच्या कबरीचा सन्मान केला जातो आहे. ही गोष्ट कटटर हिंदुत्त्व वादी नेत्यांनी कशी खपवून घेतली. 1993 मध्ये मुंबईत मोठा बॉम्बस्फोट घडवून आणला होता. त्यावेळी टायगर मेमनला पैसे पुरवणारा व्यक्ती हा याकूब मेमन होता. या बॉम्ब स्फोटात 257 जणांचा बळी गेला होता.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी