35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeराजकीयउत्तर प्रदेशसह पाच राज्यातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून दंगलीचे राजकारण; नाना पटोलेंचा निशाणा

उत्तर प्रदेशसह पाच राज्यातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून दंगलीचे राजकारण; नाना पटोलेंचा निशाणा

टीम लय भारी

मुंबई: त्रिपुरात घडलेल्या घटनेचे पडसाद म्हणून महाराष्ट्र अमरावती, नांदेड, मालेगावसह काही भागात वातावरण पेटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. उत्तर प्रदेशसह पाच राज्यात विधानसभेच्या निवडणुका लवकरच होत आहे. दंगली पेटवून निवडणुकीत त्याचा फायदा घेण्याचा भाजपाचा नेहमीप्रमाणे डाव आहे. म्हणूनच त्रिपुरा घटनेच्या आडून महाराष्ट्रात दंगली पेटवून त्यावर उत्तर प्रदेशात आपली राजकीय पोळी भाजण्याचे भारतीय जनता पक्षाचे षडयंत्र असून या षडयंत्राला राज्यातील जनतेने बळी पडू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये शांतता राखावी, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे (Nana Patole targets BJP over riots in Amravati).

काल आणि आज अमरावतीसह काही भागात घडलेल्या हिंसक घटनांचा तीव्र निषेध करून नाना पटोले म्हणाले की, महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांचे सरकार दोन वर्षापासून स्थिर असून भाजपाने हे सरकार अस्थिर करण्यासाठी खूप प्रयत्न केले पण यात त्यांना यश आले नाही.

काँग्रेस नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते गावखेड्यांपर्यंत जाऊन महागाईबाबत जनजागृती करणार : नाना पटोले

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय सरकारमध्ये बसून हेरगिरी करणाऱ्यांना चपराक; नाना पटोलेंचा हल्लाबोल

महाराष्ट्रात अशांतता पसरवून सरकार पाडण्याचे सर्व प्रकारचे उद्योग झाले त्यात महागाई, बेरोजगारी, ढासळती अर्थव्यवस्था, चीनची घुसखोरी, शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून देशभर भारतीय जनता पक्षाच्याविरोधात तीव्र असंतोष आहे. या मुख्य मुद्यापासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी भाजपाकडून असे षडयंत्र केले जात आहे. हिंसक कारवाया करणे व अफवा पसरवणाऱ्यांवर सरकारने कारवाई करावी.

समाजातील दोन घटकांमध्ये तेढ निर्माण करुन त्यावर आपली राजकीय पोळी भाजण्याचे राजकारण करणे हा भारतीय जनता पक्षाचा इतिहास राहिला आहे. देशातील ज्वलंत प्रश्नावर जनतेच्या आक्राशोला त्यांना तोंड देता येत नाही. तर जनतेमध्ये भाजपा व मोदी सरकारविरोधात प्रचंड असंतोष आहे.

पंडित नेहरूंचे योगदान नवीन पिढीला समजावे यासाठी राज्यभर कार्यक्रम राबवणार – नाना पटोले

Allegations by Fadnavis, Malik serious, issue will be raised in assembly: Nana Patole

या असंतोषाचा फटका उत्तर प्रदेशसह पाच राज्यातील आगामी विधानसभेच्या निवडणुकीत बसू नये म्हणून दंगली पेटवून मतांचे ध्रुवीकरण करण्याचा भाजपाचा डाव आहे. महाराष्ट्रातील जनतेने भारतीय जनता पक्षाचा हा कुटील हेतू ओळखून षडयंत्राला बळी पडे नये, राज्यात शांतता राखावी, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी केले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी