31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeराजकीयशिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केल्या भावना

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केल्या भावना

टीम लय भारी

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे आज पुणे येथे निधन झाले. पुण्यामधील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात बाबासाहेबांवर उपचार चालू होते. मात्र उपचार सुरु असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.त्यांची सकाळी ५.०७ वाजता प्राणज्योत मालवली(Shivshahir Babasaheb Purandare passed away in Pune today)

शिवशाहीवर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त करत म्हणाले कि हे शब्दांच्या पलीकडचं दुःख आहे.

उत्तर प्रदेशसह पाच राज्यातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून दंगलीचे राजकारण; नाना पटोलेंचा निशाणा

देशात नव्यानं पेटवा-पेटवी करण्याचं काम भाजपाने सुरू केलंय; संजय राऊतांचा हल्लाबोल

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेच्या निधनाने संपूर्ण इतिहास आणि सांस्कृतिक जगात मोठी उणीव निर्माण झाली आहे. त्यांनी दिलेल्या योगदानामुळेच पुढील येणाऱ्या पिढ्या छत्रपती शिवाजी महाराजांशी अजूनच जोडल्या जातील. त्यांनी इतरही खूप कामे केली आहेत, तीही सगळ्यांच्या आठवणीत राहतील असे मोदी म्हणाले.

Shivshahir Babasaheb Purandare passed away in Pune today
त्यांनी दिलेल्या योगदानामुळेच पुढील येणाऱ्या पिढ्या छत्रपती शिवाजी महाराजांशी अजूनच जोडल्या जातील

ते पुढे असाही म्हणाले,बाबासाहेब पुरंदरे त्यांच्या विपुल कार्यामुळे नेहमी आपल्यामध्ये जिवंत राहतील. या दुःखाच्या प्रसंगी आम्ही त्यांच्या परिवारासोबत आहोत. सकाळी १०. ३० वाजता त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची चिरंतन आराधना हेच त्यांच्या दिर्घायूच्याच ऊर्जास्रोत राहिला आहे.

50 हजार ते 5 लाख, झटपट कर्ज मिळवा; पाहा काय आहे PMMY स्कीम

Babasaheb Purandare, noted historian and Padma Vibhushan awardee, dies in Pune; PM Modi condoles death

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी