35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeराष्ट्रीयChina Border : भारताचे चीन समोर शक्ती प्रदर्शन

China Border : भारताचे चीन समोर शक्ती प्रदर्शन

भारतीय सेनेने अरुणाचल प्रदेशमध्ये एम-777 अल्ट्रा-लाइट होवित्जर तोफा तैनात केल्या आहेत. सैन्य अध‍िकाऱ्यांनी या बाबत प्रसार माध्यमांना माहिती दिली. अरुणाचलमध्ये सैन्यबळ वाढवण्यात आले आहे. लडाखमधील अतिसंवेदनशील भागात देखील हाेवित्जर तोफा तैनात करण्यात आल्या.

भारतीय सेनेने अरुणाचल प्रदेशमध्ये एम-777 अल्ट्रा-लाइट होवित्जर तोफा तैनात केल्या आहेत. सैन्य अध‍िकाऱ्यांनी या बाबत प्रसार माध्यमांना माहिती दिली. अरुणाचलमध्ये सैन्यबळ वाढवण्यात आले आहे. लडाखमधील अतिसंवेदनशील भागात देखील हाेवित्जर तोफा तैनात करण्यात आल्या. ही तोफ 3‍0 किमीपर्यंत मारा करु शकते. भारत-चीन सीमेवर (China Border) या तोफा तैनात केल्यामुळे चीनला धडकी भरली आहे. भारत-चीन संबंध हे दिवसेंद‍िवस बिघडत आहेत. त्यामुळे भारताने आपले शक्ती प्रदर्शन करु चीनला शह देण्याचा प्रयत्न केला आहे. भारत आपली बाजू नेहमी भक्क‍म करण्याचा प्रयत्न करतो. ही तोफ एका ठिकाणाहुन दुसऱ्या ठिकाणी वाहून नेणे देखील सोपे आहे.

China Border : भारताचे चीन समोर शक्ती प्रदर्शन

ही तोफ चिनूक हेलिकॉप्टरच्या मदतीने देखील दुसरीकडे वाहून नेता येऊ शकते. बीएई प्रणालीद्वारे बनवलेली ही अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त तोफ 2018 मध्ये सैन्यात दाखल झाली. बोफोर्स घोटाळयानंतर 30 वर्षांनी सैन्याला ही तोफ मिळाली.

हे सुद्धा वाचा

Yakub Memon : याकूब मेमन कोण होता ?

याकूब मेमनच्या कबरीचे सुशोभीकरण वाईटच, पण नथूराम गोडसे….

Election : आता रंगणार 1,166 ग्रामपंचायत निवडणुकांचा रणसंग्राम

भारत-चीन सीमा
भारत आणि चीन यांच्यामध्ये 3488 किलोमीटरची भू-सीमा आहे. तिला प्रत्यक्ष सीमारेषा (एल.ए.सी.) म्हणून ओळखतात. ती 1962 च्या भारत-चीन युद्धा नंतर तयार झाली आहे. दोन्ही देशांनी आतापर्यंत सीमांकन केले नाही. ब्रिटिशांनी इंडिया आणि तिबेट-चीन यांच्यात सीमा निश्चिती केली. त्या मॅकमोहन रेषेला चीनने कधीच मान्यता द‍िली नाही. 1962 च्या युद्धा नंतर चीनने अक्साई चीन आण‍ि लडाखचा सुमारे 3,8000 चौरस किमीचा प्रदेश बळकावला.

 चीनने आपल्या सिकियांग प्रांतातून पाकव्याप्त काश्मीरच्या गिलगिट बाल्टिस्तानातून मुजफ्फराबाद मार्गे चीनचा ड्रिम प्रोजेक्ट चीन पाकिस्तान ‘इकॉनॉमिक कॉरिडोर’  सुरु केले आहे. भारत-चीन सीमा रेषा ही या विभागात विभागली गेली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी