31 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
HomeमुंबईYakub Memon : याकूब मेमन कोण होता ?

Yakub Memon : याकूब मेमन कोण होता ?

देशाची आर्थिक राजधानी असलेले मुंबई शहर 12 मार्च 1993 रोजी बॉम्बस्फोटाने हादरुन गेले होते. तो क्षण अंगावर काटा आणणारा असा होता.

देशाची आर्थिक राजधानी असलेले मुंबई शहर 12 मार्च 1993 रोजी बॉम्बस्फोटाने हादरुन गेले होते. तो क्षण अंगावर काटा आणणारा असा होता. हा बॉम्बस्फोट इतका भीषण होता की, लोकांच्या कानाचे पडदे फाटले, अनेकांना कायमचे बह‍िरेपण आले. या साखळी बॉम्बस्फोटाने 12 ठिकाणी धमाका उडवला. लोक सैरावळा पळू लागले. या बॉम्बस्फोटात 257 हून अधिक लोकांनी आपले प्राण गमावले. तर 800 हून अधिक लोक जखमी झाले. तर मेजर जाधव यांनी 14 मार्चला दादरस्टेशन बाहेरून एका स्कूटीमधून आरडीएक्स जप्त केले होते.

कुख्यात दहशतवादी दाऊद याच्या सांगण्यावरुन त्यांनी साथीदारांच्या मदतीने हा बॉम्ब स्फोट घडवून आणला होता. याकूब मेमनचा (Yakub Memon) भाऊ टायगर मेमन हा या बॉम्बस्फोटाचा मुख्यसूत्रधार होता. याकूब मेमन त्याला मदत करत होता. टायगर मेमन हा या बॉम्बस्फोटाचा मुख्य सूत्रधार होता. त्याचप्रमाणे त्याला मदत करण्यात याकूबचा मोठा सहभाग होता. पैशांसंबंधी व्यवहार तो पहायचा.

याकूब मेमनलाला फाशी देण्यात आली. 1993 च्या बॉम्बस्फाेटाचा कट रचल्याप्रकरणी याकूब मेमन याला 30 जूलैला 2015 नागपूर कारागृहात सकाळी सात वाजता फाशी देण्यात आली होती. मिळालेल्या माहितीनुसार कब्रस्तानमधील दफन केलेली जागा 18 महिन्यांत खोदण्यात येते. परंतु 5 वर्षामध्ये त्याची कबर खोदण्यात आली नाही.

 हे सुद्धा वाचा

याकूब मेमनच्या कबरीचे सुशोभीकरण वाईटच, पण नथूराम गोडसे….

याकूब मेमनच्या कबरीचे सुशोभीकरण वाईटच, पण नथूराम गोडसे….

Election : आता रंगणार 1,166 ग्रामपंचायत निवडणुकांचा रणसंग्राम

ही कबर विकल्याची माहिती देखील समोर आली आहे. मात्र एका अतिरेक्याच्या कबरीवर मजार कोण चढवत आहे. हे समोर आलेले नाही. मुंबई महानगर पालिका, पोलीस प्रशासन, तत्कालीन सरकार, हिंदू संघटना यांनी त्यावेळी कबर बांधण्यास विरोध का केला नाही हाच महत्त्वाचा प्रश्न आहे. आता हा नवा वाद उकरुन काढून राज्यात पुन्हा एकदा अशांतता निर्माण करण्याचा कोण प्रयत्न करत आहे हा देखील संशोधनाचा विषय आहे. ही कबर बांधली त्यावेळी महाराष्ट्रात भाजपचे सरकार होते. हा बॉम्बस्फोट झाला त्यावेळी शरद पवार हे मुख्यमंत्री होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी