29 C
Mumbai
Friday, September 1, 2023
घरराष्ट्रीयआवाजाच्या वेगाने शत्रूवर मारा करणाऱ्या 'आयएनएस महेंद्रगिरी'चे जलावतारण

आवाजाच्या वेगाने शत्रूवर मारा करणाऱ्या ‘आयएनएस महेंद्रगिरी’चे जलावतारण

अरबी समुद्र व हिंदी महासागर प्रदेशातील आव्हाने बघता भारतीय नौदलाला मोठ्या प्रमाणात युद्धनौकांची गरज आहे. त्यानुसार माझगाव डॉकने अवघ्या १३ महिन्यांत शत्रूच्या उरात धडकी भरवणारी ‘आयएनएस महेंद्रगिरी’ युद्धनौका बनवली आहे. ‘महेंद्रगिरी’ या युद्धनौकेचे जलावतरण उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या पत्नी डॉ. सुदेश धनखड यांच्या हस्ते आज मुंबईत करण्यात आले. ‘महेंद्रगिरी’ ही भारतीय नौदलाच्या प्रोजेक्ट 17 ए अंतर्गत सातवी आणि एमडीएलकडून बांधण्यात आलेली चौथी स्टेल्थ विनाशिका आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या डॉ. सुदेश धनखड यांनी या युद्धनौकेचे नामकरण केले होते.

जगभरातील युद्धनौका बांधणीचा अभ्यास केल्यास सहा ते आठ महिन्यांत त्या बांधून दोन वर्षात ताफ्यात दाखल होतात. भारतात युद्धनौका ताफ्यात दाखल होण्याचा कालावधी सरासरी सहा ते आठ वर्षे आहे. नौदल सातत्याने विशेष पथकाद्वारे युद्धनौका निर्मितीवर लक्ष ठेऊन व कारखान्यांकडे जलद कामाचा आग्रह धरून हा कालावधी कमी करीत आहे. महेंद्रगिरी ही त्याचीच ही फलनिष्फत्ती आहे, असे या क्षेत्रातील जांकरांचे म्हणणे आहे. माझगाव डॉकने अवघ्या १३ महिन्यांत युद्धनौका उभारणीचा विक्रम केला आहे. नौदलात दाखल झाल्यानंतर ‘आयएनएस महेंद्रगिरी’, असे नाव ही युद्धनौका धारण करणारी  असून ही देशातील आजवरची सर्वांत कमी वेळेत तयार झालेली फ्रिगेट श्रेणीतील युद्धनौका आहे.

आवाजाच्या वेगाने मारा करू शकणाऱ्या ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्राने सज्ज व रडारमध्ये टिपली न जाणारी ही युद्धनौका आहे. माझगाव डॉक कारखान्यात प्रकल्प ’१७ अ’ अंतर्गत तयार होणाऱ्या ‘निलगिरी’ श्रेणीतील चारपैकी ‘महेंद्रगिरी’ ही अखेरची फ्रिगेट युद्धनौका आहे. याआधीच्या तीन युद्धनौकांचे अनुक्रमे सप्टेंबर २०१९, मे २०२२ व सप्टेंबर २०२३ मध्ये बांधणीनंतर जलावतारण झाले. मात्र या तिन्ही युद्धनौकांचा बांधणीचा कालावधी फार मोठा होता. ‘निलगिरी’चा हा कालावधी २१ महिने, ‘उदयगिरी’चा कालवधी तीन वर्षे व ‘तारागिरी’चा कालावधी दोन वर्षांचा होता.
हे सुद्धा वाचा 
बिग बींसोबत किंग खान; 17 वर्षानंतर जोडी येणार एकत्र
‘गदर2’ मुळे सनी देओलला सुगीचे दिवस; 500 कोटींकडे वाटचाल
शरद पवारांनंतर माझा नंबर लागतो : मल्लिकार्जून खर्गे

आवाजाच्या वेगाने मारा करू शकणाऱ्या ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्राने सज्ज व रडारमध्ये टिपल्या न जाणाऱ्या अशा एकूण सात युद्धनौका देशात तयार होत आहेत. माझगाव डॉकखेरीज अन्य तीन युद्धनौका कोलकात्यातील जीआरएसईमध्ये उभ्या होत आहेत. त्या अंतर्गत जीआरएसईचा पहिल्या युद्धनौका बांधणीचा कालावधी २५ महिने व अन्य दोन युद्धनौकांचा हा कालावधी प्रत्येकी २९ महिन्यांचा होता. जीआरएसईने त्यांच्याकडील अशा तिसऱ्या फ्रिगेटचे १३ दिवसआधीच जलावतारण केले.

यावेळी उपराष्ट्रपती धनखड म्हणाले की, ‘महेंद्रगिरी’ या निलगिरी श्रेणीतील सातव्या स्टेल्थ विनाशिकेचे जलावतरण म्हणजे भारतीय नौदलाच्या अचल वचनबद्धतेचा आणि असामान्य निर्धाराचा दाखला आहे. निलगिरी श्रेणीतील विनाशिकांमध्ये बसवण्यात आलेली 75 टक्के उपकरणे आणि प्रणाली एमएसएमईकडून खरेदी करण्यात आली आहेत. ही बाब प्रशंसनीय आहे. ‘महेंद्रगिरी’ या प्रोजेक्ट 17 ए श्रेणीतील सातव्या युद्धनौकेचे जलावतरण म्हणजे देशाच्या आत्मनिर्भरतेच्या संकल्पाबाबतच्या वचनबद्धतेचा योग्य दाखला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी