31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeराष्ट्रीयपोलिस एन्काऊंटर : गॅंगस्टर अतीक अहमदच्या मुलाचा खात्मा

पोलिस एन्काऊंटर : गॅंगस्टर अतीक अहमदच्या मुलाचा खात्मा

झाशीमध्ये चकमकीत पोलिसांनी असद अहमदला उडविले; प्रयागराज येथील उमेश पाल हत्याकांडात होता वाँटेड आरोपी; माफियागिरीतून झाला होता राजकारणी

पोलिस एन्काऊंटरमध्ये उत्तर प्रदेशातील खतरनाक गॅंगस्टर अतीक अहमदच्या मुलाचा खात्मा करण्यात आला आहे. झाशीमध्ये चकमकीत पोलिसांनी असद अहमदला उडविले. प्रयागराज येथील उमेश पाल हत्याकांडात तो वाँटेड आरोपी होता. असद माफियागिरीतून राजकारणी झाला होता. गुरुवारी झाशी येथे उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्ससोबत झालेल्या चकमकीत असद ठार झाला.

अतीक अहमदचा मुलगा असद आणि गुलाम हे दोघे प्रयागराज येथील उमेश पाल हत्याकांडात वाँटेड होते. त्यांच्यावर 10 लाख रुपयांचे बक्षीस होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या खातम्यानंतर घटनास्थळी विदेशी बनावटीची शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.

 

असद आणि मकसूदन यांचा मुलगा गुलाम दोघेही माफियागिरीतून राजकारणी झालेले होते. उमेश पाल हत्येप्रकरणी दोघांवर प्रत्येकी पाच लाख रुपयांचे बक्षीस होते. झाशी येथे डीवायएसपी नवेंदू आणि डीवायएसपी विमल यांच्या नेतृत्वाखालील यूपीएसटीएफ टीमसोबत झालेल्या चकमकीत ते मारले गेले. घटनास्थळी विदेशी बनावटीची अत्याधुनिक शस्त्रे जप्त करण्यात आली.

विशेष म्हणजे आजच सकाळी अतिक अहमद आणि त्याचा भाऊ भाऊ खालिद अझीम उर्फ ​​अश्रफ यांना उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील सीजेएम न्यायालयात हजर करण्यात आले. मुलाच्या एन्काऊंटरची बातमी समजताच अतिक अहमद धाय मोकलून रडला. पोलिसांनी मुद्दाम हा गेम केल्याचा आरोप त्याने केला. त्याने तासाभरापूर्वीच मुलाला भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती.

गेल्या महिन्यात, प्रयागराज येथील स्थानिक न्यायालयाने अतिक अहमद आणि इतर दोघांना 2006 च्या उमेश पाल अपहरण प्रकरणात दोषी ठरवले आणि त्यांना जन्मठेपेची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. उत्तर प्रदेश पोलिसांकडून ‘बनावट चकमकीत’ मारले जाण्याची भीती अतीकने आधी व्यक्त केली होती.

हे सुद्धा वाचा :

उत्तरप्रदेशातील गुंडेगिरी संपविल्यामुळे यूपीमध्ये भाजपाचे सरकार

पाकिस्तानी महिला झाली उत्तर प्रदेशातील गावची सरपंच; अशी झाली पोलखोल

मराठी IAS अधिकाऱ्याची कौतुकास्पद कामगिरी! थेट घुसले नक्षलवादी भागात

 

काय आहे उमेश पाल खून प्रकरण ?

2005 मध्ये झालेल्या बसपा आमदार राजू पाल यांच्या खून खटल्यातील प्रमुख साक्षीदार उमेश पाल याची या वर्षी 24 फेब्रुवारी रोजी प्रयागराजच्या धूमनगंज भागात त्यांच्या निवासस्थानाबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. अतिक हा राजू पाल हत्याकांडातीलही आरोपी आहे. उमेश पाल यांच्या पत्नी जया पाल यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे अतिक अहमद, अशरफ, त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि इतरांविरुद्ध 25 फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांच्यावर कलम 147 (दंगल), 148 (प्राणघातक शस्त्रे घेऊन दंगल), 149 (सामान्य वस्तूच्या खटल्यात केलेल्या गुन्ह्यासाठी बेकायदेशीर सभा दोषी), 302 (खून), 307 (हत्येचा प्रयत्न) आणि 506 (गुन्हेगारी धमकावणे) या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Atiq Ahmeds son killed, Police encounter,asad shot in Jhansi, umesh pal murder case, UP Bulldozer Raj

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी