29 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
Homeक्राईमअजित पवारांवर होणार ईडीची कारवाई?

अजित पवारांवर होणार ईडीची कारवाई?

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत आर्थिक घोटाळा झाला आहे. यातला एक भाग हा जारेंडेश्वर सहकारी साखर कारखान्याचा घोटाळा आहे. या कारखान्याबाबत झालेला व्यवहार का बेकायदेशीर आहे. आणि या बेकायदेशीर व्यवहारात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांचा संबंध असल्याचं या प्रकरणात नुकत्याच दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात म्हटलं आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत सुमारे 25 हजार कोटी रुपयांचा गैर व्यवहार झाला आहे. आणा हजारे यांनी या प्रकरणात्यातत जनहित याचिका दाखल केल्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हाच गुन्हा ईडीने तपासासाठी घेतला आहे.या गुन्ह्याचा बराच तपास ईडीने केला. अनेक मालमत्ता जप्त करण्यात आल्या. खुद्द जारेंडेश्वर साखर कारखाना जप्त केला आहे.या कारखान्याशी अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा यांचं नाव जोडलं गेलं आहे.

व्यवहार असा झाला आहे. जारेंडेश्वर सहकारी साखर कारखाना हा 2000 सालात सुरू झाला. कारखान्याला सतत लोन मिळत गेले. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने सुमारे 75 कोटी रुपये लोन दिल. त्याचप्रमाणे अजित पवार अध्यक्ष असलेल्या पुणे जिल्हा सहकारी बँकेनेही सुमारे 600 कोटी लोन दिलं. 10 वर्षे कारखाना तोट्यात चालला. यामुळे त्याला 2010 मध्ये बुडीत घोषित करण्यात आलं. त्याचा लिलाव करून 65 कोटी रुपये एवढया किमतीत विकण्यात आला. बँकेन खूपच कमी किंमत लावली होती. या किमतीत ओंकार बिल्डर मालक असलेल्या गुरू कमीडिटीने विकत घेतला. याच गुरू कमोडिटी मध्ये स्पार्कलिंग सोईल नावाची कंपनी भागीदार आहे आणि कंपनी अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्या मालकीची आहे.

जारेंडेश्वर कारखाण्याच्या विक्रीत मनी लोंदरिंग झाली आहे. पैसा बेकायदेशीर पण वापरण्यात आला आहे. बेकायदेशीर व्यवहार करण्यात आला आहे. कारखान्याला लोन देणाऱ्या बँकांवर अजित पवार हे महत्वाच्या पदावर होते. त्यांनी भरमसाठ लोन दिलं. हे लोन बेकायदेशीर होते.या लोन शी अजित पवार यांचा संबंध होता. यामुळे या बँकेचे व्यवहार संवश्यास्पद आहेत. बेकायदेशीर व्यवहार म्हणजेच मनी लोंदरिंग. आरोपपत्रात अजित पवार यांचा बेकायदेशीर व्यवहाराशी संबध असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे भविष्यात अजित पवार यांची ईडी चौकशी करू शकते.

हे सुद्धा वाचा: 

मला कुठलीही क्लीनचीट मिळालेली नाही : अजित पवार

अजित पवारांचा यू-टर्न कोणासाठी?

माध्यमांनी कंडया पिकवू नये ! अजित पवारांची नाराजी

ED will take action on Ajit Pawar, Ajit Pawar, NCP, Jarendeshwar cooperative sugar factory scam, ED will take action on Ajit Pawar for Jarendeshwar cooperative sugar factory scam

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी