35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeराष्ट्रीयराहुल गांधी आता आई सोनिया गांधींसोबत राहणार?

राहुल गांधी आता आई सोनिया गांधींसोबत राहणार?

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर त्यांना सरकारी बंगला खाली करण्याची नोटीस बजावण्यात आली होती. दरम्यान आज दोन ट्रक राहुल गांधी यांच्या सरकारी बंगल्यातून साहित्य घेऊन जात असताना दिसून आले.

राहुल गांधी यांच्या बंगल्याकडून हे दोन ट्रक १० जनपथ येथील काँग्रेसच्या माजी अध्यक्षा आणि राहुल गांधी यांच्या मातोश्री सोनिया गांधी यांच्या सरकारी बंगल्याकडे रवाना झाले. त्यामुळे राहुल गांधी आता आपल्या आईसोबत राहण्याची शक्यता आहे.

तुघलक मार्गावरील राहुल गांधी यांना सरकारी बंगला २२ एप्रिल पर्यत खाली करण्यास सांगण्यात आले होते. मोदी आडणावावरुन केलेल्या वक्तव्याप्रकरणी कोर्टाने राहुल गांधी यांना दोन वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. 27 मार्च रोजी लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांना सरकारी बंगला खाली करण्याची नोटीस दिली होती.

सन १०१९ मध्ये कर्नाटकात एका प्रचारसभेत राहुल गांधी यांनी मोदी आडनावावरुन एक वक्तव्य केले होते. त्यानंतर गुजरातमध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मार्च महिन्यात जिल्हा न्यायालयाने राहुल गांधी यांना याप्रकरणात दोषी ठरवत दोन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. लोकप्रतिनिधींना दोन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावल्यास त्यांचे लोकप्रतिनिधीत्तव रद्द करण्यात येते. दरम्यान राहुल गांधी यांनी याप्रकरणी आव्हान याचिका दाखल केली असून या याचिकेवर आता सुरत न्यायालय २० एप्रिल रोजी निकाल देणार आहे.

हे सुद्धा वाचा 
सुप्रिया सुळे आणि सुजात आंबेडकर यांची चैत्यभूमीवर भेट होते तेव्हा…

कर्नाटकच्या माजी उपमुख्यमंत्र्याचा भाजपला रामराम; काँग्रेसमध्ये केला प्रवेश


वर्दी घालून पानटपऱ्यांना चुना लावणारा ‘तोतया’ गजाआड

दरम्यान आज राहुल गांधी यांच्या बंगल्यातून दोन ट्रक साहित्य घेऊन सोनिया गांधी यांच्या बंगल्याकडे रवाना झाले. त्यामुळे आता राहुल गांधी सोनिया गांधी यांच्या बंगल्यात राहतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी