35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeमुंबईसुप्रिया सुळे आणि सुजात आंबेडकर यांची चैत्यभूमीवर भेट होते तेव्हा...

सुप्रिया सुळे आणि सुजात आंबेडकर यांची चैत्यभूमीवर भेट होते तेव्हा…

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आज डॉ. बाबासाहेबांना वंदन करण्यासाठी चैत्यभूमीवर आल्या असताना वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांची भेट झाली. यावेळी सुप्रिया सुळे यांनी सुजात आंबेडकर यांच्याशी संवाद साधला. तसेच आंबेडकर कुटुंबियांसोबत त्यांनी फोटो देखील काढले.

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती आज देशभरात मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. मुंबईतील चैत्यभूमीवर देखील बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मोठ्यासंख्येने भीम अनुयायी येत आहेत. आज राज्यातील अनेक नेत्यांनी देखील चैत्यभूमीवर बाबासाहेबांना वंदन केले. आज खासदार सुप्रिया सुळे या देखील चैत्यभूमीवर आल्या होत्या. त्यावेळी सुजात आंबेडकर आणि आंबेडकर कुटुंबातील सदस्यांशी त्यांची भेट झाली. यावेळी सुप्रिया सुळे यांनी सुजात आंबेडकर यांच्याशी संवाद साधला. तसेच आंबेडकर कुटुंबियांसोबत त्यांनी फोटो देखील काढले.

सुप्रिया सुळे या विविध पक्षातील नेत्यांसोबत सुसंवाद ठेवून असतात. दिल्लीत देखील त्या देशातील विविध पक्षातील लोकप्रतिनिधींशी त्यांचे राजकारणाबाहेरचा संवाद जपतात. अनेक तरुण नेत्यांशी देखील त्या तितक्यात सहजतेने बोलतात. आज देखील सुजात आंबेडकर आणि आंबेडकर कुटुंबियांशी भेटल्यानंतर त्यांनी त्यांची विचारपूस केली. सामान्य नागरिक, रस्त्यांवरील विक्रेते अशा अनेकांची त्या आस्थेने चौकशी करतात.

हे सुद्धा वाचा

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अस्थिस्तूप म्हणजे अखंड ऊर्जेचा स्रोत

कर्नाटकच्या माजी उपमुख्यमंत्र्याचा भाजपला रामराम; काँग्रेसमध्ये केला प्रवेश

डॉ. बाबासाहेबांचे मूळ आडनाव आंबेडकर नव्हते; जाणून घ्या महामानवाच्या ‘या’ खास गोष्टी

बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त त्यांनी चैत्यभूमीवर भेट दिल्यानंतर तेथील फोटो प्रदर्शनाला देखील त्यांनी भेट दिली. तसेच बाबासाहेबंच्या आयुष्यातील अनेक प्रसंगातील फोटो पाहिले, तसेच तेथील पीआरओ टीमसोबत देखील फोटो काढला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी