34 C
Mumbai
Saturday, June 1, 2024
Homeराजकीयकर्नाटकच्या माजी उपमुख्यमंत्र्याचा भाजपला रामराम; काँग्रेसमध्ये केला प्रवेश

कर्नाटकच्या माजी उपमुख्यमंत्र्याचा भाजपला रामराम; काँग्रेसमध्ये केला प्रवेश

कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी यांनी बुधवारी भाजपला सोडचिठ्ठी दिली, त्यानंतर आज सावदी यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला. कर्नाटक विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार सामना रंगला आहे. भाजपने सावदी यांना विधानसभेसाठी तिकीट न दिल्यामुळे सावदी नाराज झाले, त्यांनी भाजपला रामराम करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

शुक्रवारी सकाळी लक्ष्मण सावदी यांनी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. तसेच त्यांनी कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशअध्यक्ष डी. शिवकुमार यांची देखील भेट घेतली. चर्चेनंतर सावदी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, असल्याची माहिती डी. शिवकुमार यांनी दिली. कर्नाटक निवडणूक भाजपसाठी अटीतटीची ठरणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत. भाजपचे अनेक पदाधिकारी काँग्रसेमध्ये प्रवेश करत आहेत. त्यातच माजी उपमुख्यमंत्र्यांनीच काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

बुधवारी लक्ष्मण सावदी यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला. सावदी अथनी विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. मात्र भाजपने त्यांचे तिकीट कापल्याने ते नाराज झाले. त्यानंतर त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांची भेट घेतली. भाजपने कर्नाटक निवडणुकीसाठी उमेदवारांच्या याद्या जाहिर केल्या, त्यामध्ये लक्ष्मण सावदी यांचे नाव नसल्याने सावदी नाराज झाले होते. सावदी यांच्या ऐवजी काँग्रेसमधून भाजपत आलेले आमदार महेश कुमठल्ली यांना तिकीट देण्यात आले होते.

हे सुद्धा वाचा 

वर्दी घालून पानटपऱ्यांना चुना लावणारा ‘तोतया’ गजाआड
अजब : 6 कोटी जनतेचा अपमान करणाऱ्या कुत्र्याविरोधात गुन्हा दाखल!
“लोढा यांनी आपली बुद्धी खर्ची घालावी”; ‘त्या’ प्रस्तावावरून सुषमा अंधारेंचे खडे बोल

लक्ष्मण सावदी यांचे तिकीट कापल्याने त्यांच्या समर्थकांनी अथणीमध्ये मोठा मोर्चा काढत त्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. सावदी हे अथणी विधानसभा मतदारसंघातून तीनवेळा आमदार म्हणून निवडूण आले आहेत. मात्र यावेळी त्यांचे तिकीट कापल्यामुळे ते नाराज होते. भाजपने तिकीट नाकारल्याने त्यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी