28.1 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeटेक्नॉलॉजी"व्हीजेटीआय" म्हणजे, १३६ वर्षांच्या गौरवशाली परंपरेची भन्नाट कहाणी...!

“व्हीजेटीआय” म्हणजे, १३६ वर्षांच्या गौरवशाली परंपरेची भन्नाट कहाणी…!

मुंबईतील परळ भागात कापड गिरणी मालकांच्या दानशूरतेतून उभी राहिलेली 'व्हिक्टोरिया ज्युबिली टेक्निकल इन्स्टिट्यूट' ही सर्वात जुनी तंत्र शिक्षण संस्था अतिशय समृध्द वारसा घेऊन 'वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्था" या बदललेल्या नावाच्या स्वरूपात यंदा आपला शतकपूर्ती महोत्सव साजरा करीत आहे.

मुंबईतील परळ भागात कापड गिरणी मालकांच्या दानशूरतेतून उभी राहिलेली ‘व्हिक्टोरिया ज्युबिली टेक्निकल इन्स्टिट्यूट’ ही सर्वात जुनी तंत्र शिक्षण संस्था अतिशय समृध्द वारसा घेऊन ‘वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्था” या बदललेल्या नावाच्या स्वरूपात यंदा आपला शतकपूर्ती महोत्सव साजरा करीत आहे.

देशविदेशातील बड्या कंपन्यांना तंत्रकुशल मनुष्यबळ पुरविणारी ही संस्था सुमारे १३६ वर्षांच्या गौरवशाली परंपरेची साक्ष देत माटुंगा येथे मोठ्या दिमाखाने उभी आहे.
शतकपूर्तीच्या निमित्ताने या संस्थेच्या ऐतिहासिक परंपरेला उजाळा देण्याचा “लय भारी” चा हा प्रयत्न आहे. संस्थेचे रजिस्ट्रार आर. एन. आवळे यांच्याशी बातचीत केली असता, त्यांनी संस्थेचा संपूर्ण इतिहास कथन केला.

आवळे म्हणाले, स्वातंत्र्यपूर्व काळात १८८७ मध्ये मुंबईतील जनजीवन कापड गिरण्यांवर चालत होते. या कापडगिरण्यांसाठी तंत्रज्ञान कुशल मनुष्यबळ उपलब्ध होण्याच्या उद्देशाने कापडगिरण्यांचे मालक असलेले सर दिनशॉ पेटीट, दिनशॉ वाच्छा, दादाभाई नौरोजी, फिरोजशहा मेहता, बद्रुद्दीन तय्यबजी, एन.एन. वाडिया यासारख्या नामवंत उद्योजकांनी मोठी दानशूरता दाखवून ‘व्हिक्टोरिया ज्युबिली टेक्निकल इन्स्टिट्यूट’ ही संस्था उभारली. या संस्थेने सुरुवातीला टेक्स्टाईल आणि मेकॅनिकल अशा २ ट्रेडमध्ये डिप्लोमा अभ्यासक्रम सुरू केले.

भायखळा येथील इमारतीत १८८७ पासून १९२३ पर्यंत संस्था कार्यरत होती. त्यानंतर सध्याच्या माटुंगा येथील इमारतीत स्थलांतरित झाली. १९४६ मध्ये संस्थेचा विस्तार करून डिप्लोमाचे ६ विभाग, ९ पदवी अभ्यासक्रम आणि १८ पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यात आले. १९५५-५६ मध्ये मास्टर्स डिग्री अभ्यासक्रम सुरू झाले. स्वायत्त दर्जा मिळाल्यापासून संस्थेची उत्तरोत्तर प्रगती झाली.

त्यावेळेसच्या समाजधुरिणांनी लावलेल्या इवल्याशा रोपट्याचे आज मोठया वटवृक्षात रूपांतर झाले. सुरुवातीला फक्त १०० विद्यार्थ्यांना प्रवेश देणाऱ्या व्हीजेटीआय संस्थेमधून आता दरवर्षी ६५० विद्यार्थी पदवी घेऊन बाहेर पडतात. ३६० विद्यार्थी ३ वर्षांचा डिप्लोमा अभ्यासक्रम पूर्ण करतात. तर तब्बल ४२५ विद्यार्थी २ वर्षांचा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम पूर्ण करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

व्हीजेटीआयमध्ये सध्याच्या घडीला सुमारे ५ हजार विद्यार्थी शिक्षण घेत असून संस्थेत ५०० शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत. केंद्र व राज्य सरकार, महापालिका आणि विविध उद्योगांच्या उपक्रमांमध्ये व्हीजेटीआयचा महत्त्वपूर्ण सहभाग असतो. निवासी इमारतींचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ असो अथवा जुन्या इमारतींची दुरुस्ती व मजबुती करण्याचे काम व्हीजेटीआयकडून अगदी माफक शुल्कात केले जाते. विटा, सिमेंट, वाळू, माती, पोलाद आदी बांधकाम साहित्याचे परीक्षण करून त्याबाबतचा अहवाल संस्थेकडून दिला जात असल्याची माहिती आवळे यांनी दिली.

व्हीजेटीआयच्या स्थापनेचा
अतिशय रंजक इतिहास !

व्हीजेटीआयची स्थापना केली जात असतानाच्या वर्षात ब्रिटनच्या महाराणी व्हिक्टोरिया यांचा हीरक महोत्सव सुरू होता. त्यामुळेच संस्थेचे नाव व्हिक्टोरिया ज्युबिली टेक्निकल इन्स्टिट्यूट असे ठेवण्यात आले. संस्थेच्या उभारणीसाठी मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर लॉर्ड रे यांनी रॉयल ज्युबिली फंड नावाने ८० हजार रुपये देणगी दिली. शिक्षणतज्ञ रिपन मेमोरियल फंडातून दीड लाख रुपये आणि सर जमशेटजी जिजीभाय मेमोरियल फंडातील काही रक्कम मिळून ही संस्था उभी राहिली.

हे सुद्धा वाचा 

IPL 2023 : ‘या’ चुकीमुळे हार्दिक पांड्याला पडला 12 लाखांचा दंड!

राहुल गांधी आता आई सोनिया गांधींसोबत राहणार?

सुप्रिया सुळे आणि सुजात आंबेडकर यांची चैत्यभूमीवर भेट होते तेव्हा…

मोहम्मद अली जिनांचा
व्हीजेटीआयशी संबंध !

व्हीजेटीआयची उभारणी ज्या जागेवर झाली त्या जागेची मालकी सर दिनशॉ पेटीट यांची होती. पेटीट यांची एकुलती एक कन्या भारताची फाळणी करणारे व पाकिस्तानचे जनक बनलेले मोहम्मद अली जिना यांच्या प्रेमात पडली होती. जिना यांनी पेटीट यांच्या कन्येशी प्रेमविवाह केल्याने ते खूप व्यतीथ झाले. या रागातून त्यांनी आपल्या कन्येला संपूर्ण संपत्तीतून बेदखल केले. त्याचबरोबर व्हीजेटीआयच्या उभारणीसाठी आपली संपूर्ण जमीन दान केली होती, अशी माहिती आवळे यांनी दिली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी