30 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeराष्ट्रीयभाजपविरोधात विरोधकांची एकजूट; पाटण्यातील बैठकीत काय म्हणाले पवार-ठाकरे ?

भाजपविरोधात विरोधकांची एकजूट; पाटण्यातील बैठकीत काय म्हणाले पवार-ठाकरे ?

केंद्रातील सत्ताधारी भाजप विरोधात आज बिहारमधील पाटणा येथे देशातील विरोधी पक्षांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. येणाऱ्या 2024 च्या लोकसभा निवडणुकीत सर्व विरोधीपक्ष एकत्रीतपणे भाजपविरोधात लढा देतील अशी महत्त्वपूर्ण चर्चा या बैठकीत झाली. संवैधानिक मुल्यांच्या जपणुकीसाठी तसेच भाजपच्या धोरणांचा विरोध करण्यासाठी एक संयुक्त आघाडी स्थापन करुन भाजपविरोधी राजकीय पक्षांनी एकत्र येण्यासंबंधीची चर्चा पाटण्यात पार पडली. या बैठकीला देशभरातील राजकीय पक्षांचे नेते उपस्थित होते.

या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, आज देशात प्रत्येक दिवशी एक नवी समस्या आम्ही पाहत आहे, धार्मिक तेढ निर्मान करण्याचा प्रयत्न ठिकठिकाणी होत आहे. समाजाच्या एकोप्यासाठी आज भाजप आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या विरोधात आपल्याला सामना करावा लागेल. हा सामना सर्वांनी मिळून करावा लागेल. काही मतभेद जरुर असतील मात्र देशहितासाठी आपसातील समस्यांकडे दुर्लक्ष करुन पुढे जाण्याचे ठरविले आहे. मला विश्वास आहे की पाटण्यातून सुरु झालेली ही सुरुवात देशात बदल घडवून आणण्याची सुरुवात आहे.

मला आठवते जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वात एक संदेश येथूनच दिला होता. ज्यामुळे संपूर्ण देशात वेगळे वातावरण निर्मान झाले होते. अनेक आंदोलनांची सुरुवात येथून झाली, आणि देशाच्या इतिहासाने ती स्विकारली. आजच्या वातावरणात नितीश कुमार यांनी बैठक बोलविली आणि सर्वजण येथे उपस्थित राहिले. बैठकीत जी चर्चा झाली त्यात सर्वांनी एकत्रीतपणे काम करण्याचे ठरविण्यात आले आहे. यामुळे आम्हाला एक नवा रस्ता दिसू लागला आहे. मला विश्वास आहे देशाची जनता याचे समर्थन करेल, असे शरद पवार यावेळी म्हणाले.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, देशाची एकता, अखंडता राखण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. यापुढे आमच्या लोकशाहीवर जो आघात करेल त्यांचा आम्ही एकजुटीने विरोध करु. जो कोणी देशात हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न करेल त्याच्याविरोधात आम्ही एकजुटीने उभे राहू, आजची सुरुवात चांगली झाली असल्याचे देखील ठाकरे यावेळी म्हणाले.

पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या (पीडीपी) नेत्या मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या. “आम्ही गांधींच्या भारताला गोडसेचा देश होऊ देऊ शकत नाही.” महात्मा गांधींनी सांगितलेल्या आदर्शांचे जतन करण्यावर त्यांनी यावेळी भर दिला. तसेच गांधींच्या आदर्शाला मोडून काढणाऱ्यांच्या विरोधात प्रतिकार करण्याचा निर्धार देथील त्यांनी यावेळी व्यक्त केला. बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि आरजेडीचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव म्हणाले, मी आता शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त झालो आहे, आणि मोदींना ‘फिट’ करण्याची वेळ आली आहे. देशातील जनेतची इच्छा आहे, आम्ही भाजप आणि आरएसएसविरोधात एकजुटीने लढले पाहिजे असे देखील ते यावेळी म्हणाले.

सीपीआय नेते डी. राजा यांनी यावेळी बोलताना भाजपच्या नऊ वर्षांच्या राजवटीवर जोरदार हल्लाबोल केले. भाजपची राजवट भारतीय संविधानासाठी विघातक आणि हानिकारक असल्याचे देखील ते यावेळी म्हणाले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या “भाजपला इतिहास बदलायचा आहे, परंतु आम्ही इतिहास जतन केला जाईल यासाठी प्रयत्न करू.” जमलेल्या विरोधी पक्षनेत्यांना सोबत घेऊन भाजपच्या विरोधात एकजुटीने लढण्याची शपथ त्यांनी घेतली.

हे सुद्धा वाचा

रेशनिंग दुकानांमध्ये मिळणार बँकांच्या सुविधा, मंत्री रवींद्र चव्हाण यांचा गोरगरीबांसाठी मोठा निर्णय !

शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता त्यातच निवडणूक आयोगाच्या नोटीसांमुळे मुख्याध्यापक त्रस्त

संत निवृत्तीनाथांच्या पालखीने केला 339 किमीचा प्रवास; संत तुकाराम महाराजांची पालखी आज सराटी मुक्कामाला

तर या बैठकीच्या आयोजनासाठी ज्यांनी पुढाकार घेतला ते बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले, आम्ही देशहितासाठी एकत्र आलो आहोत. केंद्रात सत्ताधारी असेलले देशहिताच्याविरोधी आहेत. देशातील 17 पक्षांनी येणाऱ्या 2024 च्या लोकसभा निवडणुका एकत्रीत लढण्याचा निर्धार केला असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

तर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी देखील या बैठकीला पाठिंबा दर्शविला. राहुल गांधी म्हणाले. विरोधी पक्षांमध्ये काही मतभेद जरुर असू शकतात. मात्र हे सर्व विरोधी पक्षांनी आज समानविचारधारेसाठी मतभेद बाजूला ठेवून एकत्र येत काम करण्याचा निश्चय केला आहे. राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सांगितले की, विरोधी पक्षांची पुढील बैठक शिमला येथे होईल, जिथे 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी एक समान धोरण निश्चित केले जाईल.

नॅशनल कॉन्फरन्सचे (एनसी) नेते ओमर अब्दुल्ला बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना म्हणाले,
आम्ही देशाला उद्ध्वस्थ होण्यापासून वाचविण्यासाठी आणि लोकशाहीपरत आणण्यासाठी एकत्र आलो आहोत. मी आणि मेहबुवा मुफ्ती देशाच्या अशा प्रदेशातून येतो जिथे लोकशाहीची हत्या झाली आहे. काल अमेरिकेत व्हाईट हाऊसमध्ये लोकशाहीवर चर्चा झाली. मग जम्मू काश्मिरमध्ये लोकशाही का पोहचत नाही असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी