30 C
Mumbai
Tuesday, September 5, 2023
घरराष्ट्रीय'या' कारणामुळे भारतात सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस 'शिक्षक दिन' म्हणून साजरा होतो...

‘या’ कारणामुळे भारतात सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा होतो…

थोर शिक्षणतज्ञ, तत्वज्ञ आणि भारताचे पहिले उपराष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णनन हे स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते. 13 मे 1952 ते – 13 मे 1962 दरम्यान त्यांची उपराष्ट्रपती पदाची कारकीर्द राहिली. त्यांनी स्वतंत्र भारताचे दुसरे राष्ट्रपती म्हणूनही काम पाहिले. 13 मे 1962 – 13 मे 1967) या कार्यकाळात त्यांनी राष्ट्रपती पदाचा कार्यभार सांभाळला.

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन म्हणून साजरी केली जाते. शिक्षण क्षेत्रात त्यांनी भरीव योगदान दिले. राजेंद्र प्रसाद यांच्या तुलनेत डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा कार्यकाळ अधिक आव्हानांनी भरलेला होता. डॉ राधाकृष्णन यांच्या काळात भारताने शेजारील शत्रूराष्ट्राचा सामना केला. त्यांच्या कारकिर्दीत दरम्यान भारताचे चीन आणि पाकिस्तानशी युद्ध झाले. शिक्षणक्षेत्रापाठोपाठ राजकीय क्षेत्रात त्यांचे भरीव योगदान राहिले.

डॉ राधाकृष्णन यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 रोजी तामिळनाडू राज्यातील चित्तोर जिल्ह्यातील तिरुत्तनी येथे झाला. डॉ राधाकृष्णनन यांच्या वडिलांचे नाव सर्वपल्ली विरास्वामी आणि आईचे नाव सिताम्मा होते. तिरुत्तनी गावातच त्यांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. मद्रास ख्रिश्चन कॉलेज मधून आपले शिक्षण पूर्ण केले.

राधाकृष्णन यांनी मद्रास प्रेसिडेन्सी कॉलेज आणि म्हैसूर विद्यापीठात व्याख्याता म्हणून काम पाहिलं.
ते भारतातील सर्वात प्रसिद्ध तत्त्ववेत्ते आणि शिक्षक बनले. केवळ ज्ञान आणि विज्ञानाच्या मदतीनेच आनंदी आणि सुखी जीवन संभव आहे या विचाराने समाज साक्षर करण्याचा त्यांनी वसा घेतला होता. भारताने १९५४ साली त्यांना ‘भारतरत्न’ हा किताब देऊन त्यांना गौरविले.

हे ही वाचा

अरेरे, कोरोनात सामान्य माणूस आणखीन पिचला, राजकीय पक्ष गबर झाले!

आंबेडकर, लोकशाही आणि आजची परिस्थिती…

गोविंदा आला रे आला…. आकर्षक रंगातली मडकी बाजारात दाखल

माझा जन्म दिवस साजरा करण्यापेक्षा 5 सप्टेंबर शिक्षक दिवस म्हणून साजरा केला तर मला जास्त आनंद होईल, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. त्यांच्या शिक्षणातील योगदानाची दखल घेऊन भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी