35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeराष्ट्रीयसनातन धर्म वादात 'हे' काय म्हणाले प्रियांक खरगे?

सनातन धर्म वादात ‘हे’ काय म्हणाले प्रियांक खरगे?

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माबाबत केलेल्या वादग्रस्त व्यक्तव्याने देशभरात खळबळ उडाली आहे. हे प्रकरण गरम असतानाच आता कॉँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे पुत्र प्रियंक खरगे यांनी उदयनिधी स्टॅलिन यांच्या व्यक्तव्याला पाठिंबा दिला आहे. ‘कोणताही धर्म जो समानतेचा पुरस्कार करत नाही तसेच माणूस म्हणून एखाद्याला सन्मान देत नाही तो धर्म नसून आजार आहे,” असे म्हणत प्रियंक खरगे यांनी उदयनिधी यांच्या व्यक्तव्याला पाठिंबा दिला. प्रियंक खरगे यांच्या या व्यक्तव्याने हा विवाद आणखी वाढला आहे.

उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माबद्दल केलेल्या व्यक्तव्यानंतर देशभरात गदारोळ उडाला होता. सत्ताधारी पक्ष भारतीय जनता पक्ष याबाबत कॉँग्रेस आणि इंडिया आघाडीमधील पक्षांवर निशाणा साधत आहेत. त्यात, कॉँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या पुत्राच्या विधानाने भाजपला आयते कोलीत मिळाले आहे. याबाबतीत, कॉँग्रेससह इतर मित्र पक्षांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. पण कर्नाटक राज्यात कॉँग्रेसचे मंत्री असलेल प्रियांक खरगे यांनी याबाबत प्रतिक्रिया दिल्यामुळे हा वाद आणखी चिघळण्यावही शक्यता आहे.

काय म्हणाले प्रियंक खरगे?
कर्नाटक राज्याचे मंत्री असलेले प्रियंक खरगे यांनी बेंगळुरू मध्ये पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर उत्तर देत म्हंटले, “कोणताही धर्म जो समानतेचा पुरस्कार करत नाही किंवा माणूस म्हणून कोणाला सन्मान देत नाही. माझ्या मते तो धर्म नाही.. कोणताही धर्म जो समान अधिकार देत नाही किंवा माणसाशी माणसासारखा व्यवहार करत नाही, तो धर्म आजाराच्या समान आहे.” प्रियंक खरगे यांनी या व्यक्तव्यातून कुठल्याही धर्माचे नाव घेतले नसून धर्मांमधील असमानतेवर त्यांनी भाष्य केले आहे.

उदयनिधी यांनी नेमके काय व्यक्तव्य केले?
तामिळनाडूचे मंत्री असलेले उदयनिधी स्टॅलिन यांनी ‘सनातन उन्मूलन संमेलन’ या कार्यक्रमात सनातन धर्माबाबत बोलताना म्हटले, “सनातनचा केवळ विरोध नाही तर याला समूळ नष्ट केले गेले पाहिजे. सनातन धर्म सामाजिक न्याय आणि समानतेच्या विरुद्ध आहे. काही गोष्टींचा केवळ विरोध करून चालत नाही तर त्या नष्ट करायला हव्यात. आपण डेंग्यू, मलेरिया किंवा कोरोंना यांचा विरोध करत नाही तर यांना मिटवण्याचा प्रयत्न करतो.

हे ही वाचा 

अरेरे, कोरोनात सामान्य माणूस आणखीन पिचला, राजकीय पक्ष गबर झाले!

जालना लाठीचार्ज प्रकरणी फडणवीसांनी मागितली मराठ्यांची माफी!

मोदींवरील भाजपच्याच ट्विटचा दाखला देत आव्हाडांनी केली पंचाईत

उदयनिधी स्टॅलिन यांच्या वक्तव्यानंतर त्याविरोधात संत परमहंस आचार्य यांनी त्यांचा वक्तव्याचा निषेध करत त्यांच्या फोटो तलवारीने कापला आणि उदयनिधी यांचा शिरच्छेद करणाऱ्यांना १० कोटी रुपयांचे बक्षिस जाहीर केले आहे. तामिळनाडूत डी एम के हा पक्ष द्रविड विराचधारेचा पुस्कार करणारा हा पक्ष आहे. हिंदू धर्मातील सनातन विचारधारेला या पक्षाचा विरोध राहिलेला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी