31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeराजकीयआमची लढाई एनसीबीशी नाही : नवाब मलिक

आमची लढाई एनसीबीशी नाही : नवाब मलिक

टीम लय भारी

मुंबई : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाने आता वेगळेच वळण घेतले आहे. एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी आर्यन खानला सोडण्यासाठी पैसे मागितल्याचा आरोप पंच प्रभाकर साईल यांनी केला होता. याच पार्श्वभूमीवर राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर निशाणा आहे (Nawab Malik said, Our fight is not with NCB).

मलिक यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटले आहे की, आमची लढाई ही एनसीबीशी नसून फर्जीवाडा करून सरकारी नोकरीत काम करणाऱ्या समीर वानखेडेशी आहे. गेल्या ३५ वर्षात एनसीबीने देशात चांगलंच काम केले आहे. तसेच या आधी कधीही कोणी एनसीबीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले नाही.

आर्यनचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर नवाब मलिकांची प्रतिक्रिया, म्हणाले…

गोसावीच्या बॉडीगार्डचे एनसीबीविरोधात खळबळजनक दावे; नवाब मलिक म्हणतात, एसआयटीमार्फत चौकशी करा

परंतु फर्जीवाडा करून सरकारी नोकरीत काम करणाऱ्या समीर वानखेडेचा मी खुलासा केला आहे. मी कुठलीही चुकीची किंवा वाईट गोष्ट केलेली नाही. मी फक्त समीर वानखेडेचा जन्म दाखला पोस्ट केला. मी हिंदू मुस्लिम असा मुद्दा कधीच केला नाही, याउलट भाजपने धर्माच्या नावावर राजकारण करत याला धार्मिक रंग दिला. असे मलिक म्हणाले.

आर्यन खानच्या काऊन्सिलिंगचे व्हिडीओ जाहीर करा;नवाव मलिकांचे थेट NCB ला आव्हान

Nawab Malik claims Sameer Wankhede is illegally tapping phones

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी