28.1 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रअनैतिक संबंधातून बाळाचा जन्म, तीन महिन्यांच्या बाळाचा खून

अनैतिक संबंधातून बाळाचा जन्म, तीन महिन्यांच्या बाळाचा खून

टीम लय भारी

पुणे : बाळाचे अपहरण झाल्याची तक्रार करणाऱ्या आईनेच त्याची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जन्मदात्या आईनेच तीन महिन्यांच्या चिमुकल्याचा निर्घृण खून केल्याचा आरोप आहे. पुण्यात घडलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.तीन महिन्यांच्या मुलीचे घरातून अपहरण झाल्याची तक्रार आईने केली होती. मात्र आपल्या बाळाचा तिनेच गळा दाबून खून केल्याचे उघडकीस आले आहे (Crime, the murder of a three month old baby).

“नातेवाईकांना काय सांगायचे?”

संबंधित महिला घटस्फोटीत आहे. अनैतिक संबंधातून जन्मलेल्या मुलीबाबत नातेवाईकांना काय सांगायचे, या प्रश्नातून या महिलेने हा खून केल्याचा आरोप केला जात आहे.

दारू पिण्यावरून दोन जणांनी हॉटेलच्या कर्मचाऱ्यावर केला जीवघेणा हल्ला

बापरे! वृध्देने सुपारी समजून अडकित्त्याने फोडला गावठी बॉम्ब

आईला अटक, अल्पवयीन मुलगा ताब्यात

आपल्या 13 वर्षांच्या मुलाच्या मदतीने महिलेने तीन महिन्याच्या मुलीचा गळा दाबला. त्यानंतर तिला पुण्यातील बंडगार्डन पुलावरून नदीत फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आईला अटक केली असून मुलालाही ताब्यात घेतले आहे.

टाकीत बुडवून आईकडून बाळाची हत्या

दुसरीकडे, मध्य प्रदेशातील उज्जैनमधील खाचरोड येथे एका आईने आपल्या 3 महिन्यांच्या मुलीची हत्या केल्याचा आरोप आहे. आईने गुगलवर बाळाची हत्या करण्याची पद्धत सर्च केली होती. ही घटना 12 ऑक्टोबरला घडली होती, मात्र दहा दिवस पोलिसांना गुंगारा देणारी निष्ठुर आई अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडली.

१० लाख लाच प्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्त्याला पोलीस कोठडी, पीडब्ल्यूडीच्या दोन अधिकाऱ्यांना तूर्त दिलासा

nashik: Fewer cyber crime plaints this year

खाचरोड येथील घराच्या तिसऱ्या मजल्यावरील पाण्याच्या टाकीत मुलीचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी मुलीच्या आई स्वातीला खुनाच्या आरोपाखाली अटक केली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी