31 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeराजकीयक्रूझ पार्टीत तो दाढीवाला आंतरराष्ट्रीय ड्रग्जमाफिया कोण?; नवाब मलिकांचा सवाल

क्रूझ पार्टीत तो दाढीवाला आंतरराष्ट्रीय ड्रग्जमाफिया कोण?; नवाब मलिकांचा सवाल

टीम लय भारी

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे विभागीय संचालक आणि आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाचा तपास करणारे समीर वानखेडे यांच्यावर आरोप करण्याचा सपाटाच लावला आहे. आजही पत्रकार परिषद घेत त्यांनी आणखी काही नवे आणि गंभीर आरोप वानखेडेंवर केले आहेत. समीर वानखेडे यांचे आंतरराष्ट्रीय ड्रग्जमाफियाशी संबंध असल्याचा आरोप त्यांनी केला आहे (Nawab Malik’s new allegation against Sameer Wankhede).

आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना मलिक यांनी वानखेडे, के.पी. गोसावी, प्रभाकर साईल आणि वानखेडेंच्या चालकाच्या सीडीआर तपासणीची मागणी केली आहे. इलेक्ट्रॉनिक तपास झाल्यास काही शंका राहणार नाही, असं मलिक यांचं मत आहे. मुंबईत झालेल्या क्रूझ पार्टीमध्ये एक आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफिया आपल्या बंदुकधारी प्रेयसीसह सहभागी असल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे.

मुंबई पोलीस आयुक्तांनी घेतली गृहमंत्र्यांची भेट, समीर वानखेडेंवर होणार गुन्हा दाखल?

नवाब मलिकांच्या नवीन ट्विटनं राज्यात खळबळ…

याविषयी बोलताना मलिक म्हणाले, ही ड्रग पार्टी फॅशन टीव्हीने आयोजित केली होती. कोविड प्रोटोकॉल असूनही महाराष्ट्र सरकारकडून कोणत्याही प्रकारची परवानगी घेण्यात आली नव्हती, पोलिसांना या पार्टीची माहिती देण्यात आली नव्हती. गृहविभागालाही याबद्दल काही कल्पना नव्हती. या पार्टीत लक्ष्य करण्यात आलेल्या लोकांचे फोटो देऊन त्यांना अडकवण्यात आलं. पण माझ्या माहितीनुसार, त्या पार्टीमध्ये एक आंतरराष्ट्रीय ड्रग्जमाफिया उपस्थित होता.

समीर वानखेडे आपल्या मर्यादा ओलांडत आहेत : नवाब मलिक

Nawab Malik shares picture from Sameer Wankhede’s first marriage, questions the NCB official’s caste certificate

त्याच्यासोबत त्याची बंदुकधारी प्रेयसीही होती. जो तिथे नाचत असल्याचं दिसत आहे, तो दाढीवाला आहे. तो दाढीवाला कोण आहे हे NCB च्या सर्वांना माहित आहे. मला मिळालेल्या माहितीनुसार, तो काही काळ तिहार कारागृहात होता, राजस्थानच्या कारागृहातही होता. याची मैत्री वानखेडेंसोबतही आहे. काही अधिकाऱ्यांनी मला सांगितलं की गोव्यातही त्यांचं मोठं रॅकेट आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी