फोटो गॅलरी

PHOTO:पत्रकार ते निधड्या छातीचा शिवसैनिक; असा आहे संजय राऊतांचा प्रवास

गेल्या अनेक दिवसांपासून पत्राचाळ घोटाळा प्रकरणामुळे चर्चेत असलेले शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत हे आज त्यांचा 61 वा वाढदिवस साजरा करत आहेत.उच्च न्यायालयातून जामीन  मिळाल्यापासून राऊतांनी अनेक पत्रकार परिषद घेऊन विरोधकांवर खणखणीत टीका सुद्धा केली आहे.आपल्या याच बेधडक विधानांसाठी प्रसिद्ध असलेले संजय राऊत यांना शिवसेनेचा चाणक्य सुद्धा म्हंटले जाते. याच संजय राऊतांचा क्राइम रिपोर्टर ते शिवसेना खासदार हा प्रवास कसा राहिला हे आपण पाहूया….

शिवसेनेच्या 17 प्रमुख नेत्यांच्या यादीत येणारे संजय राऊत यांच्या करिअरची सुरूवात राजकारणातून नाही तर पत्रकारितेतून झाली होती. राऊत सुरुवातीला ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या पुरवठा विभागात काम करत होते,नंतर पुढे जाऊन  राऊतांनी मार्केटिंग विभागात काम करण्यास सुरवात केली.

गुन्हेगारी विश्वातील पत्रकारितेवर चांगली पकड असल्यामुळे राऊत ‘लोकप्रभात’ या साप्ताहिकात क्राईम रिपोर्टर म्हणून रूजू झाले. सूत्रांकडून योग्य प्रकारे माहिती काढणं, बातमीचा माग काढणं, हे सर्व गुण राऊतांमध्ये असल्यामुळे त्यांचा समावेश त्यावेळच्या उत्कृष्ट क्राईम रिपोर्टरमध्ये व्हायचा.

आतापर्यंत क्राईम रिपोर्टर ते संपादक असा प्रवास खूप कमी लोकांनी केला आहे.क्राईम रिपोर्टींगपासून सुरूवात करणारे खूप कमी पत्रकार आहेत जे संपादक झालेले आहेत.संजय राऊत सुद्धा त्या कमी पत्रकारांपैकी एक आहेत.क्राईम रिपोर्टर ते संपादक असा प्रवास खूप कमी लोकांनी केला आहे.

सन 1993 मध्ये संजय राऊत सामनाचे कार्यकारी संपादक झाले, त्यांच्या बेधडक आणि बिनधास्त लेखांमधून ते शिवसेनेच्या भूमिकेशी मिळतीजुळती भूमिका घेत असल्याचं बाळासाहेब ठाकरेंना समजून आलं होते.

हे सुद्धा वाचा

Jitendra Awhad Case : ‘मविआ’ सरकारच्या काळात पुरावे असूनही कारवाई होत नव्हती; चंद्रशेखर बानकुळेंचा आरोप

Jitendra Awhad : विनयभंगाप्रकरणी जितेंद्र आव्हाडांना अटकपूर्व जामीन मंजूर

Bharat Jodo Yatra : राज्यातील महिला मोठ्या संख्येने भारत जोडो यात्रेत सहभागी : जयराम रमेश

सामना मध्ये आल्यानंतर राऊतांनी बाळासाहेब ठाकरेंची फटकेबाजी मारणारी आणि त्याचवेळा बोचकारे काढणारी अशी मार्मिक शैली पूर्णपणे आत्मसात केली होती. सामनातील राऊतांचा लेख पाहून जणू बाळासाहेबच तो लेख लिहिलाय असे सर्वांना वाटत होते. ‘सामना’ वृत्तपत्र कसे चर्चेत राहील याची काळजी नेहमी राऊतांनी घेतली आहे, आणि त्यांच्या याच कामामुळे त्यांनी बाळासाहेबांवर चांगली छाप पाडली होती.

शिवसेनेचे राज्यसभा खासदार तसंच दिल्लीत पक्षाची ठाम भूमिका मांडणारा एक चेहरा म्हणूनही राऊतांची ओळख आहे.शिवसेनेने सामनाचे संपूर्ण अधिकार त्यांच्या हातात दिलेले आहेत. कोणत्याही पक्षात कुणी काय बोलायचं याचा एक सिद्धांत ठरलेला असतो. त्यामुळे परिस्थिती ओळखूनचं राऊत त्यांची भूमिका वठवतात.

संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्या बोलण्यात अनेकवेळा विरोधाभास दिसून आला आहे. तरीसुद्धा राऊतांचं पक्षातलं स्थान कधी ढळलं नाही.उद्धव ठाकरेंनीही त्यांना एक विशेष स्थान दिलं आहे, जे उद्धव ठाकरे बोलत नाहीत ते संजय राऊत बोलू शकतात.

संजय राऊत हे उत्तम राजकारणी, चांगले वक्ते, बेधडक पत्रकार,स्वाभिमानी नेते अशा अनेक भूमिकेत आत्तापर्यंत सर्वांना दिसले आहेत. पण या भूमिकांसोबतच अशा अनेक भूमिका आहेत जे राऊत उत्तमपणे पार पडतात मग ती भूमिका एका मुलाची असो एका पतीची किंवा मग एका वडिलांची.गेल्या वर्षभरात राहूतांचे अनेक स्वरूप जगाला दिसून आले आहेत, मग तो तुरुंगात असताना आईला सांत्वना देणारे पत्र लिहिणारा एक मुलगा असो किंवा मग आपल्या मुलीच्या लग्नात एका सामान्य बापाप्रमाणे ढसाढसा रडणारे एक संवेदनशील व्यक्तिमत्व राऊतांमध्ये दिसून आले आहेत .

 

टीम लय भारी

Recent Posts

‘पुष्पा 2’ रिलीज होण्यापूर्वीच ‘पुष्पा’ राज..पहिल्या गाण्याचा प्रोमो आऊट

काही दिवसांपूर्वीच 'पुष्पा 2' (Pushpa 2)या चित्रपटातील गाण्याची एक झलक निर्मात्यांनी प्रदर्शित केली. येत्या 1…

15 mins ago

शिवसेने कडून रवींद्र वायकर यांना उमेदवारी

उत्तर पश्चिम मुंबई येथून अखेर रवींद्र वायकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे(Ravindra Waikar is…

23 mins ago

आचारसंहिता काळात ८ हजार ३३० जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई; पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची माहिती

जळगाव जिल्ह्यात लोकसभा निवडणुका शांततेत पार पडण्यासाठी जिल्हा पोलीस दलाने गेल्या काही महिन्यांपासून कारवाईचा धडाका…

40 mins ago

स्वामी सिद्धेश्वरानंद सरस्वती महाराज यांचा उमेदवारी अर्ज दाखल

महंत शांतिगिरी महाराज यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केल्यांनतर मंगळवारी महन्त सिद्धेश्वरानन्द सरस्वतीजी महाराज यांनी…

1 hour ago

राजाभाऊ वाजे १४ कोटीं ८० लाखांचे धनी

नाशिक लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार पराग (राजाभाऊ) वाजे (Rajabhau Waze) यांच्याकडे जंगम (चल) व…

1 hour ago

नाशिकमध्ये झाडाच्या बुंध्यांना कांक्रीटीकरण

स्मार्ट सिटीच्या सुशोभीकरणासाठी पदपथांचे काम करताना अनेक झाडाच्या बुंध्याला ( tree trunks) सिमेंटचा (Concretisation) वेढा…

2 hours ago