29 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रBharat Jodo Yatra : राज्यातील महिला मोठ्या संख्येने भारत जोडो यात्रेत सहभागी...

Bharat Jodo Yatra : राज्यातील महिला मोठ्या संख्येने भारत जोडो यात्रेत सहभागी : जयराम रमेश

मंगळवारी भारत जोडो यात्रा विदर्भातील वाशीम जिल्ह्यात दाखल झाली आहे. भारत जोडो यात्रेमध्ये राज्यातील कानाकोपऱ्यातून लोक सहभागी होत आहेत. परंतु या यात्रेची उल्लेखनीय बाब म्हणजे अनेक महिला या भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी झालेल्या आहेत.

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा आज महाराष्ट्रात नववा दिवस आहे. राज्यातील नांदेड येथील देगलूर येथून या यात्रेला सुरुवात झाली. मंगळवारी (ता. 15 नोव्हेंबर) ही भारत जोडो यात्रा विदर्भातील वाशीम जिल्ह्यात दाखल झाली आहे. भारत जोडो यात्रेमध्ये राज्यातील कानाकोपऱ्यातून लोक सहभागी होत आहेत. परंतु या यात्रेची उल्लेखनीय बाब म्हणजे अनेक महिला या भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी झालेल्या आहेत. काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार जयराम रमेश यांच्या नेतृत्वात याबाबतची पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत जयराम रमेश यांनी काँग्रेसच्या महिला नेत्यांसहित भारत जोडो यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या महिलांचे कौतुक केले आहे. या पत्रकार परिषदेत तिवसा विधानसभेच्या आमदार यशोमती ठाकूर, काँग्रेसच्या विधानपरिषदेच्या आमदार डॉ. प्रज्ञा राजीव सातव आणि सोलापूर शहर मध्यच्या आमदार प्रणिती शिंदे उपस्थित होत्या.

खासदार जयराम रमेश यांनी बिरसा मुंडा जयंतीच्या शुभेच्छा देऊन पत्रकार परिषदेला सुरुवात केली. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सुरु असलेली भारत जोडो यात्रा ही काँग्रेस पक्षाच्या संघटनेचे महत्वपूर्ण काम करत आहे. मागील 70 दिवसात काँग्रेस पक्षात एकजूट झाल्याचे मत यावेळी जयराम रमेश यांनी व्यक्त केले.भारत जोडो यात्रेचा हेतू वेगळा आहे. लोकांना एकत्र आणणे, देशाला एकत्र आणणे तसेच महागाई, भ्रष्टाचार सारख्या मुद्द्यावर भाष्य करण्यासाठी राहुल गांधी यांच्या नेतृत्वात भारत जोडो यात्रा सुरु करण्यात आली आहे. या यात्रेमधील महिलांचा सहभाग आणि महिलांकडून मिळणारा पाठिंबा उल्लखनीय आहे. या यात्रेमुळे काँग्रेस पक्षात परिवर्तन आल्याची माहिती जयराम रमेश यांच्याकडून देण्यात आली आहे.

भारत जोडो यात्रेमुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होतेय : यशोमती ठाकूर
विदर्भात दाखल झालेल्या झालेल्या भारत जोडो यात्रेला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची वंदना घेऊन सुरुवात करण्यात आल्याची माहिती आमदार यशोमती ठाकूर यांनी दिली. प्रत्येक महिला हिंमतवान आहे. ज्याप्रमाणे एखादी महिला घर नीट सांभाळू शकते त्याचप्रमाणे ती देश देखील नीट सांभाळू शकते. आजपर्यंत या यात्रेत 15 किमीचा प्रवास केला आहे. यात्रेमुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आहे. ही ऊर्जा सगळ्यांना एकत्र करतेय. आम्ही आई सावित्रीच्या लेकी आहोत. असेही यष्टिमती ठाकूर यावेळी म्हणाल्या.

या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर केलेल्या विनयभंगाच्या आरोपांचे देखील खंडन केले. विनयभंग काय आहे, हे मी आता सांगू शकते असे यशोमती ठाकूर म्हणाल्या. तसेच काहींना काँग्रेसमुक्त भारत करणे शक्य झाले नाही त्यामुळे त्यांनी ईडी आणि इतर संस्थांचा गैरवापर करण्यास सुरुवात केली आहे. मी माझ्या वैयक्तिक खात्यातून भारत जोडो यात्रेसाठी पैसे दिले आहेत. तसेच काही काँग्रेस कार्यकर्त्यांनी देखील त्यांच्या खात्यातून पैसे दिले आहेत, अशांची ईडीकडून चौकशी करण्यात येतेय, अशी माहिती यावेळी यशोमती ठाकूर यांच्याकडून देण्यात आली आहे.

तर, काँग्रेसचे दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या पत्नी विधानपरिषदेच्या आमदार डॉ. प्रज्ञा सातव या गेल्या पाच दिवसांपासून या यात्रेत सहभागी झालेल्या आहेत. आम्ही राहुल भैय्यांच्या पाठीशी राहून चालत निघालोय. वाढत्या महागाईविरोधात आवाज उठवण्यासाठी तसेच वाशिमचा आवाज बुलंद करण्यासाठी मोठ्या संख्येने महिला या यात्रेत सहभागी झाल्या आहेत. काँग्रेसच्या काळात सिलेंडरचे भाव वाढल्यावर आंदोलन करणारे मोदी आणि स्मृती इराणी आता का गप्पा आहेत ? असा प्रश्न यावेळी प्रज्ञा सातव यांनी उपस्थित केला.

हे सुद्धा वाचा

Bharat Jodo Yatra : भारत जोडो यात्रेत राहूल गांधी यांना झाली ‘या’ मित्राची आठवण, म्हणाले….

Bharat Jodo Yatra : शेतकरी, कामगारांच्या खिशातून मोदी खोऱ्याने पैसे ओढत आहेत; राहुल गांधी यांचा घणाघात

Bharat Jodo Yatra : भारत जोडो यात्रेला राज्यात पहिल्याच दिवशी प्रचंड उत्साह

आमदार प्रणिती शिंदे या गेल्या काही दिवसांपासून या यात्रेत सहभागी झाल्या आहेत. प्रणिती शिंदे यांचे वडील राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे हे देखील वयाच्या 82 व्या वर्षी पाच किलोमीटर पर्यंत भारत जोडो यात्रेत चालल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. अनेक महिला, ऊसतोड कामगार महिला, शेतमजूर महिला या यंत्रात सहभागी होत आहेत. तर अनेक महिला राहुल गांधी यांची औक्षण करण्यासाठी उत्सुक असल्याची माहिती प्रणिती शिंदे यांनी यावेळी दिली. या यात्रेत सहभागी होणारा प्रत्येक जण ‘भारत यात्री’ आहे. ही यात्रा मानवतेची असल्याने अनेक महिला या यात्रेत सहभागी होत आहेत, असे देखील यावेळी प्रणिती शिंदे यांच्याकडून यावेळी सांगण्यात आले.

दरम्यान, महाराष्ट्रात 18 दिवस ही यात्रा सुरु राहणार आहे. काँग्रेस प्रमाणेच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते देखील या यात्रेत सहभागी होणार आहेत.ठाकरे गटाचे युवानेते आदित्य ठाकरे हे दाखल या यात्रेत सहभागी झाले होते. वाशीम जिल्हा हा आधी देखील काँग्रेसचा गाद होता आणि यापुढे देखील राहील असा विश्वास यावेळी खासदार जयराम रमेश यांनी व्यक्त केला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी