32 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमनोरंजनतब्बल 23 वर्षांनंतर भारतीय व्यक्तीची पाकिस्तानच्या तुरुंगातून सुटका

तब्बल 23 वर्षांनंतर भारतीय व्यक्तीची पाकिस्तानच्या तुरुंगातून सुटका

टीम लय भारी

अमृतसर : मध्यप्रदेशच्या सागर शहरातून तब्बल 23 वर्षांपूर्वी बेपत्ता झालेली व्यक्ती पाकिस्तानच्या तुरुंगातून सुटून घरी परतली आहे. प्रल्हादसिंग राजपूत असे या संबंधित व्यक्तीचे नाव आहे. अमृतसरच्या अटारी सीमेवर पाकिस्तानी सैन्याने प्रल्हाद यांना भारतीय लष्कराच्या ताब्यात दिले आहे (Pralhad Rajput has returned home from a Pakistani prison). 

आश्चर्याची बाब म्हणजे प्रल्हाद राजपूत जेव्हा 33 वर्षांचे होते तेव्हा ते बेपत्ता झाले होते. आणि वयाच्या 56 व्या वर्षी ते पुन्हा घरी परतले आहेत. पाकिस्तानच्या तुरुंगातून सुटल्यावर प्रल्हाद हे हातात दोन पिशव्या घेऊन परतले आहेत. प्रल्हाद यांचा लहान भाऊ वीर सिंह यांना भावाच्या भेटीनंतर आनंद गगनात मावेना.

शिवसेना उपजिल्हाप्रमुखावर जीवघेणा हल्ला

आमदार रोहित पवारांचा राम शिंदेंना ‘दे धक्का’

प्रल्हाद यांचे भाऊ वीरसिंह राजपूत यांनी सांगितले की, 1998 मध्ये प्रल्हाद हे मानसिकदृष्ट्या कमकुवत होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना वयाच्या 33 वर्षी अचानक ते गायब झाले होते. या संदर्भात पोलिस ठाण्यात तक्रार केली असता, 2014 मध्ये पोलिस घरी आले होते. तेव्हा त्यांनी सांगितले की प्रल्हाद हे पाकिस्तानी तुरुंगात आहेत.

देवेंद्र फडणवीसांचा अनिल परब यांच्यावर आणखी एक वार

Prahlad Singh Rajput to return home after 23 years in Pakistan jail

प्रल्हाद पाकिस्तानला कसे पोहोचले हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. त्यांचा शोध लागल्यानंतर त्यांना पाकिस्तानातून भारतात आण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. अखेर प्रल्हाद यांच्या सुटकेचा दिवस उजाडला आणि ते भारतात परत आले आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी