31 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeराजकीयप्रशांत किशोर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या चर्चांना दिला पूर्णविराम

प्रशांत किशोर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या चर्चांना दिला पूर्णविराम

टिम लय भारी

मुंबई :-  विधानसभा 2022 मध्ये होणाऱ्या पाच राज्यातील निवडणुकांपूर्वीच राजकीय घडामोडींना वेग आला आहे. कॉंग्रेस विधानसभा निवडणुक स्वबळावर लढणार आहे. गेली सात वर्षे देशातील सत्तेबाहेर असलेल्या काँग्रेसने या निवडणुकांमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली आहे. तसेच, राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली होती. परंतु प्रशांत किशोर यांनी आता राजकारणातील प्रवेशाबाबत मोठं विधान करत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे (Prashant Kishor put an end to the discussions entering the Congress).

प्रशांत किशोर यांनी सांगितले आहे की, सध्याच्या परिस्थितीत मी कुठल्याही राजकीय घडामोडींचा भाग नाही आहे. तसेच २०२२ मध्ये होणाऱ्या पाच राज्यांमधील निवडणुकीतही माझी कुठलीही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष भूमिका नसेल, असेही प्रशांत किशोर यांनी स्पष्ट केले. पण प्रशांत किशोर यांच्या काँग्रेसमधील प्रवेशाबाबत काँग्रेसनेही कुठलेही विधान केलेले नाही. तसेच ही बाब फेटाळूनही लावलेली नाही.

देशांतर्गत कुरबुरी आटोक्याबाहेर, हे गृहमंत्र्यांचे मोठे अपयश – राहुल गांधी

राज कुंद्राच्या खात्यातून कोणाच्या खात्यात पैसे जात होते? पोलीसांनी केला तपास

प्रशांत किशोर यांनी सांगितले की, सध्याचा पंजाबमधील विषय असो वा कुठली अन्य विषय असो. काँग्रेसच्या कुठल्याही निर्णयामध्ये माझा कुठलाही सहभाग नव्हता. तसेच बंगालच्या विधानसभा निवडणुकीनंतर मी सक्रिय राजकारणातून बाजूला होण्याचा जो निर्णय घेतला होता. त्यावर मी अजूनही कायम आहे. राजकारणातील प्रवेशाबाबत मी काही निर्णय घेतला तर त्याबाबत मी सार्वजनिक मंचावरून घोषणा करेन. परंतु सक्रिय राजकारणामध्ये काम सुरू ठेवायचे की नाही, याबाबत मी अद्याप कुठलाही निर्णय घेतलेला नाही, असेही प्रशांत किशोर यांनी स्पष्ट केले (I have not taken any decision yet he said).

Prashant Kishor put an end to the discussions Congress
प्रशांत किशोर

साडेचार वर्षाच्या आयुषकडून उध्दव ठाकरेंना अनोखी सलामी

Prashant Kishor: How to win elections and influence people

तसेच, प्रशांत किशोर यांच्या काँग्रेसमधील प्रवेशाबाबत पक्षातील सूत्रांनी सांगितले की, या प्रकरणी कुठलाही निर्णय हा काँग्रेस नेतृत्व आणि प्रशांत किशोर यांनी एकत्र येऊन घेतला पाहिजे. पण काँग्रेस याबाबत अनौपचारिकपणे चर्चा करत आहे. सध्या काँग्रेस पंजाब आणि राजस्थानमधील घडामोडींबाबत चिंतीत आहे. पक्षश्रेष्ठींनी काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. पंजाबमध्ये राज्याच्या प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे नवज्योतसिंग सिद्धूकडे सोपवली आहेत. तर राजस्थानमध्येही पक्षात मोठे फेरबदल होणार आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी