32 C
Mumbai
Tuesday, May 7, 2024
Homeराजकीयपंतप्रधान मोदी विकणार 'या' सरकारी कंपनीतील हिस्सेदारी

पंतप्रधान मोदी विकणार ‘या’ सरकारी कंपनीतील हिस्सेदारी

टीम लय भारी

नवी दिल्ली:- देशात मोदी सरकार आल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील संपत्ती विकत असल्याचे आरोप होत आहेत. मोदींनी देशातील अनेक सरकारी कंपन्या विकल्या आहेत. देशातील काही सरकारी जमिनीचे तुकडे देखील मोदींनी विकले असल्याचे आरोप झाले आहेत. ये देश नही बिकने दुंगा बोलणारे  मोदी, आता पुन्हा एकदा मोदी सरकार देशातील एका सरकारी कंपनीतील काही टक्के हिस्सेदारी विकणार असल्याचे समोर आले आहे (Prime Minister Modi sell ‘this’ government company)

केंद्र सरकार हुडको या सरकारी कंपनीतील 8 टक्के हिस्सेदारी विकणार आहे. संस्थात्मक गुंतवणुकदार मंगळवारी यासाठी 45 रुपयांच्या समभागाप्रमाणे बोली लावतील. HUDCO चे 16.01 कोटी समभाग विकून केंद्र सरकारला 720 कोटी रुपयांची कमाई होण्याची अपेक्षा आहे.

राज्यपालांकडून पंडीत नेहरूंचा अवमान, अशोक चव्हाणांनी व्यक्त केला संताप

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा भास्कर जाधवांना फोन; चिपळूण प्रकरणाबाबत म्हणाले…

गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता प्रबंधन विभागाचे सचिव तुहिन कांत पांडे यांच्या माहितीनुसार, ऑफर फॉर सेल पद्धतीने हुडकोच्या समभागांची विक्री होणार आहे. नॉन रिटेल गुंतवणुकदार आजपासून हे समभाग विकत घेऊ शकतात. तर सामान्य गुंतवणुकदारांसाठी ही समभाग खरेदी उद्यापासून खुली होणार आहे (Prime Minister Modi The stock will be open for general investors from tomorrow).

Prime Minister Modi sell 'this' government company
पंतप्रधान नरेंद्र मोदी

गेल्या सत्रात भांडवली बाजार बंद झाला तेव्हा हुडकोच्या समभागाची किंमत 6.22 टक्क्यांनी घसरून 47.50 रुपयांवर पोहोचली होती. ऑफर फॉर सेलसाठी फ्लोअर प्राईस 45 रुपये इतकी आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शहर विकास मंत्रालयाला हुडकोच्या समभागांची विक्री करण्याची मंजुरी दिली होती.

येडियुरप्पा यांची कर्नाटक मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची घोषणा

Govt to sell 8 pc stake in HUDCO via ‘offer for sale’ route on July 27-28

हुडकोची स्थापना 25 एप्रिल 1970 रोजी झाली होती. यापूर्वीही केंद्र सरकारने हिस्सेदारी विकून 7646 कोटी रुपये कमावले होते. त्यामध्ये 3651 कोटी रुपये ऑफर फॉर सेल तर 3994 कोटी तर एक्सिस बँकेतील एसयुयुटीआयची हिस्सेदारी विकून 3994 कोटींची कमाई केली होती.

(Prime Minister Modi sell 'this' government company
हुडको सरकारी कंपनी

मोदी नेहमी म्हणत असतात की मे ये देश नही बिकने दूंगा, मात्र मोदी सरकारने आतापर्यंत देशातील अनेक सरकारी कंपन्यामधील हिस्सेदारी विकली आहे. आणि अजूनही विकत असल्याचे दिसून येत आहे. मोदी देश विकत आहेत, असे आरोप पक्षांसोबत सर्वसामान्य जनता देखील मोदींवर हा आरोप करत आहे ( Prime Minister Modi about general public along with the parties are accusing Modi of selling the country).

2020 मध्ये मोदी सरकारने 28 सरकारी कंपन्या हिस्सेदारी विकली

1- स्कूटर्स इंडिया लि.,
2- ब्रिज ऐंड रूफ कंपनी इंडिया लि,
3- हिंदुस्तान न्यूज प्रिंट लि.,
4- भारत पंप्स ऐंड कम्प्रेसर्स लि,
5- सीमेंट कॉरपोरेशन ऑफ इंडिया लि.,
6- सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स लि,
7- भारत अर्थ मूवर्स लिमिटेड,
8- फेरो स्क्रैप निगम
9- पवन हंस लिमिटेड,
10- एअर इंडिया और उसकी पांच सहायक कंपनियां और एक संयुक्त उद्यम,
11- एचएलएल लाइफकेयर,
12- हिंदुस्तान एंटीबायोटिक्स लि.,
13- शिपिंग कॉरपोरेशन ऑफ इंडिया,
14- बंगाल केमिकल्स एंड फार्मास्यूटिकल्स लिमिटेड.
15- नीलांचल इस्पात निगम लिमिडेट
16- हिंदुस्तान प्रीफैबलिमिटेड (HPL),
17 – इंजीनियरिंग प्रोजेक्ट्स इंडिया लिमिटेड,
18- भारत पेट्रोलियम कॉरपोरेशन
19- कंटेनर कॉरपोरेशन ऑफ इंडिया (CONCOR)
20- एनएमडीसी का नागरनकर स्टील प्लांट,
21- सेल का दुर्गापुर अलॉय स्टील प्लांट, सलेम स्टील प्लांट और भद्रावती यूनिट.
22- टीएचडीसी इंडिया लिमिटेड (THDCIL)
23- इंडियन मेडिसीन ऐंड फार्मास्यूटिकल्स कॉरपोरेशन लिमिटेड (IMPCL),
24- कर्नाटक एंटीबायोटिक्स,
25-इंडियन टूरिज्म डेवलपमेंट कॉरपोरेशन (ITDC) की कई ईकाइयां
26- नॉर्थ ईस्टर्न इलेक्ट्रिक पावर कॉरपोरेशन लिमिटेड (NEEPCO)
27- प्रोजेक्ट ऐंड डेवलपमेंट इंडिया लि.
28- कामरजार पोर्ट

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी