33 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रमहादजी शिंदेंसमोर दिल्लीचा बादशहा मुजरा करायचा, एकनाथ शिंदे दिल्लीत जाऊन कुर्निसात करतात,...

महादजी शिंदेंसमोर दिल्लीचा बादशहा मुजरा करायचा, एकनाथ शिंदे दिल्लीत जाऊन कुर्निसात करतात, हरी नरके यांची टीका

टीम लय भारी

मुंबई : प्राध्यापक हरी नरके यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटावर खोचक टीका केली आहे. प्राध्यापक हरी नरके यांनी ट्विट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या बंडखोर आमदारांना खडे बोल सुनावले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज (दि. ९ जुलै २०२२) दिल्ली येथे गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. त्याच भेटीला उद्देशून प्रा. हरी नरके यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे.

प्राध्यापक हरी नरके यांनी काही मिनिटांच्या अंतराने तीन ट्विट केले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना सोडली नाही, असे सांगण्यात येत आहे. मग ते विधानसभा अध्यक्ष निवडणुकीच्या वेळी भाजपच्या राहुल नार्वेकर यांना मत द्या, असा व्हीप कसा काय काढू शकतात? असा प्रश्न त्यांनी या ट्विटच्या माध्यमातूनउपस्थित केला आहे.

जर एकनाथ शिंदे आजही शिवसेनेत आहेत मग ते महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ ठरवायला दिल्लीत का गेले? शिंदे गट हा भाजपमध्ये विलीन झालाय का? असा टोला प्राध्यापक हरी नरकेंनी आपल्या ट्विटमधून लगावला आहे. इतिहासातील महादजी शिंदे यांना दिल्लीचा बादशहा मुजरा करायचा, पण हे शिंदे दिल्लीकरांना मुजरा करायला गेले का? असा खोचक प्रश्न त्यांनी एकनाथ शिंदे यांना विचारला आहे.

दरम्यान, या ट्विटमध्ये त्यांनी शिंदे गटाने स्वतःला भाजपकडे सरेंडर केले आहे का? हे दाढीवाले सुरतेला मुजरा करत आहेत का? असे प्रश्न उपस्थित करत बोचरी टीका केली आहे. प्राध्यापक हरी नरके यांच्या या ट्विटनंतर आता एकनाथ शिंदे किंवा त्यांच्या गटातील इतर कोणताही आमदार काही उत्तर देईल का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

हे सुद्धा वाचा :

चित्रा वाघ नरेंद्र मोदींवर भडकल्या, गॅस दरवाढीवरून जाम संतापल्या !

शंभूराज देसाई म्हणाले, आमचा उठाव दोन वर्षांपूर्वीच व्हायला हवा होता

माजी IPS अधिकारी संजय पांडे ‘नॉट रिचेबल’

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी