33 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमंत्रालयपीडब्ल्यूडीच्या कार्यकारी अभियंत्याला ठेकेदारांकडून हवेय २० टक्के कमिशन

पीडब्ल्यूडीच्या कार्यकारी अभियंत्याला ठेकेदारांकडून हवेय २० टक्के कमिशन

टीम लय भारी

मुंबई : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पीडब्ल्यूडी) अंधेरी कार्यालयात पंधरवड्यापूर्वी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची धाड पडली होती. त्यात १० लाखाची लाच घेताना एकाला रंगेहाथ पकडले होते. त्या अगोदर याच कार्यालयात साधारण आठ महिन्यांपूर्वी दोन धाडी पडल्या होत्या. त्यात पाच अधिकारी निलंबित झाले होते (PWD’s executive engineer wants 20% commission from contractors).

त्यानंतरही लाच घेण्यासाठी चटावलेले अधिकारी सुधारण्याची चिन्हे नाहीत. या कार्यालयात देवेंद्र पवार नावाचे नवीन कार्यकारी अभियंता रूजू झाले आहेत. पवार यांना १५ ते २० टक्के कमिशन द्यायचे आहे, असे विभागातील शाखा अभियंता व उप अभियंता उघङपणे ठेकेदारांना सांगत आहेत. याबाबतची व्हिडीओ क्लिपच ‘लय भारी’च्या हाती आली आहे.

पीडब्ल्यूडीचे दोन अधिकारी व माहिती अधिकार कार्यकर्ता १० लाखाची लाच घेताना ACB च्या जाळ्यात

सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी बंपर भरती, पीएचडीधारकांनो करा अर्ज

अंधेरी विभागातील एक शाखा अभियंता ठेकेदाराशी बार्गेनिंग करताना या व्हिडीओमध्ये दिसत आहे. ‘साहेबांना १५ ते २० टक्के द्यावे लागतात’, असे हा अभियंता स्पष्टपणे बोलताना दिसत आहे.

अंधेरी विभागात गेल्या काही महिन्यांत पीडब्ल्यूडीमार्फत अनेक कामे झाली आहेत. या कामांचा निधी आता प्राप्त झाला आहे. त्याबाबतची देयके अदा करताना अभियंत्यांनी ठेकेदारांच्या नाकीनऊ आणले आहे.

पीडबल्यूडीच्या अधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यालाच लावला चूना, बोगस कामे करून लाखो रूपये लाटले

MEP Infra receives LOA from PWD Maharashtra for JV road project

काही अधिकारी मनमानीपणे ठेकेदारांना ओरबाडण्याचे काम करीत आहेत. आता मात्र कार्यकारी अभियंत्यांनी तब्बल २० टक्के रकमेची मागणी केली आहे. त्यामुळे आमचे धाबे दणाणले असल्याची माहिती एका ठेकेदाराने ‘लय भारी’शी बोलताना दिली. याबाबत देवेंद्र पवार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, ही माहिती चुकीची आहे. असा कोणताही प्रकार आम्ही करीत नाही.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी