31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeराजकीयशरद पवारांच्या प्रश्नाला राहूल गांधींचे ‘कडक’ उत्तर!

शरद पवारांच्या प्रश्नाला राहूल गांधींचे ‘कडक’ उत्तर!

टीम लय भारी

नवी दिल्ली / मुंबई :- ‘तुम्ही खरोखरच एकट्याने निवडणुका लढणार आहात का?’ असा सवाल शरद पवार यांनी आठवडाभरापूर्वी काँग्रेस नेत्यांना विचारला होता. आता या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे, आणि ते सुद्धा खुद्द राहूल गांधी यांच्याकडूनच! (Rahul Gandhi answer to Sharad Pawar question)

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले वारंवार जाहीरपणे स्वबळाची भाषा वापरत होते. शिवसेनेवरही त्यांनी शरसंधान साधले होते. पटोले यांचा ‘स्वबळा’चा नारा राज्यातील अनेक काँग्रेस नेत्यांनाही पटला नव्हता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर भाषणात स्वबळावरून काँग्रेसवर टीका केली होती (Chief Minister Uddhav Thackeray had criticized the Congress in his public speech).

नाना पटोलेंचा संजय राऊतांना खोचक टोला

नाना पटोलेंचा मोदी सरकारवर घणाघाती हल्ला; मोदी सरकार कुंभकर्णासारखे झोपले आहे

गेल्या आठवड्यात काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण शरद पवार यांच्याकडे गेले होते.

काँग्रेस–राष्ट्रवादीच्या या प्रमुख नेत्यांमध्ये बरीच चर्चा झाली. काँग्रेसच्या स्वबळाच्या नाऱ्यावरून पवारांनी नाराजी व्यक्त केली. ‘तुम्ही खरंच एकट्याने निवडणुका लढणार आहात का?’ असा सवालच पवार यांनी केला होता. त्यावेळी काँग्रेसच्या या प्रमुख नेत्यांना उत्तर देता आले नव्हते. पण आता राहूल गांधींनी त्या प्रश्नाचे उत्तर दिले आहे.

पती राज कुंद्राच्या अटकेनंतर अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या कामात अडचणी

On Rahul Gandhi’s Oxygen Tweet, Minister Giriraj Singh’s Post In Italian

महाराष्ट्रात होणाऱ्या आगामी सगळ्या निवडणुका स्वबळावर लढण्याची सूचना राहूल गांधी यांनी केली आहे. वर्षभरात स्थानिक स्वराज्य संस्था व इतर निवडणुका मोठ्या प्रमाणात होणार आहेत. या निवडणुका काँग्रेसने स्वबळावर लढवाव्यात, अशी भूमिका राहूल गांधी यांनी मांडली आहे.

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मंगळवारी राहूल गांधी यांना भेटण्यासाठी गेले होते. या भेटीतील चर्चेचा तपशील पटोले यांनी नंतर माध्यमांना सांगितला.

राहुल गांधी यांच्याशी चर्चा झाली, यावेळी के. सी. वेणुगोपाळही उपस्थित होते. महाराष्ट्रात आज जी काय स्थिती आहे. इतर पक्षांपेक्षा त्यात काँग्रेसचा विस्तार सर्वाधिक आहे. त्यामुळे काँग्रेसचा विस्तार नियोजनबद्ध कसा वाढवायचा, त्यावर सखोल चर्चा या बैठकीत झाली असल्याची काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले आहे (Congress state president Nana Patole said that the meeting was held).

विधानसभा निवडणुकीला अजून तीन वर्ष बाकी आहेत. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढेल. सरकार आणि संघटना या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. त्याला सर्व पक्षांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे हा वाद संपलेला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर निवडणुका स्वबळावर लढण्याची सूचना राहूल गांधी यांनी केली आहे. असे पटोले यांनी सांगितले आहे.

Rahul Gandhi answer to Sharad Pawar question
शरद पवार आणि राहुल गांधी

एकट्या लढण्याच्या या निर्णयाचा सद्यस्थितीत महाविकास आघाडीवर कोणताही परिणाम होणार नाही, कारण ते पक्षाची सत्ता वाढविण्याचे काम करत राहतील, असे राहुल गांधी म्हणाले आहेत. असेही नाना पटोलेंनी सांगितले आहे.

राहुल गांधी यांच्याशी चांगली भेट झाली. पक्षाला बळकटी देण्यासाठी आम्ही विविध विषयांवर चर्चा केली आणि काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात महाविकास आघाडीकडे राहील, असे असले तरी आगामी निवडणुका केवळ स्वबळावर लढवणार असल्याचे आम्ही ठरविले आहे. असेही पटोले म्हणाले.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले, इतर केंद्रीय मंत्र्यांना भेटले. त्याकडे तुम्ही कसे पाहता, असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर, ही त्यांच्या पक्षाची अंतर्गत गोष्ट आहे. त्यांनी कुणाला भेटावे किंवा भेटू नये हा त्यांचा वयक्तिक निर्णय आहे. सध्या मोदी सर्व जनतेची हेरगिरी करत आहे. लोकांच्या प्रायव्हसीला धोका पोहचवण्याचे काम मोदी आणि भाजप करत आहे. काँग्रेस हेरगिरी करण्याचे काम करत नाही, असेही पटोले म्हणाले आहेत.

2016- 17 मध्ये फडणवीस सरकारमध्ये माझे फोन टॅप झाले होते. सत्ताधारी आणि विरोधकांचेही फोन टॅप झाले होते. त्याबाबत मी विधानसभेत आवाज उठवला होता. त्याची चौकशी सुरू आहे, असे पटोलेंनी सांगितले आहे.

दरम्यान, राज्यात काँग्रेसच्या काही मंत्र्यांना डच्चू देण्यात येण्याच्या चर्चांना त्यांनी पूर्णविराम दिला. मंत्र्यांना डच्चू देण्यात येण्याच्या चर्चांमध्ये काहीही तथ्य नाही. सध्या मंत्रिमंडळात फेरबदल होणार नाही. तशी काही चर्चा महाविकास आघाडीत झाली नाही. पुढच्या काळात फेरबदल होणार की नाही याचा निर्णय हायकमांड घेईल, असे नाना पटोलेंनी स्पष्ट केले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी