33 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeसंपादकीयवारीचा विसर

वारीचा विसर

प्रा. प्रशांत कराळे

आजकाल बरीचशी मंडळी वारकरी संप्रदायाचा ‘सोंग’ घेऊन कर्मकांडी विचारसरणी पसरवीत आहेत. मुळात वारकरी संप्रदाय हा त्या काळातील ब्राह्मणी व्यवस्थेच्या कर्मकांडी प्रवृत्तीच्या विरोधात पुकारलेले बंड होते आणि सर्व जातीतील तसेच तळागाळातील लोकांना सामावून घेणे हे त्याचे उद्दिष्ट होते. त्यातूनच वारी ही संकल्पना उदयास आली. इतिहासकार डी. डी. कोसंबी यांनी यावरती प्रचंड अभ्यास केलेला आहे. मुळात ‘टाळ कुटणारे’ पवित्र आणि मांसाहार करणारे अपवित्र असे विचार कुठेना कुठे मूळ वारकरी सांप्रदायाच्या समता, सर्वसमावेशकता तसेच विद्रोही विचारसरणीचा विसर पडलेले वाटतात.

आजही हजारो वर्षांपूर्वीपासून वास्तव्य करणारा आदिवासी समाज मांसाहार करतो. त्यांच्या प्रत्येक जन्मापासून ते मरण्यापर्यंतच्या सण उत्सवांमध्ये मांसाहार असतो. झोपडपट्टीत राहणारा, गावाच्या बाहेर पालावर राहणारा, तांड्यात राहणारा, काबाडकष्ट करणारा आमचा मजूर होतकरू वर्ग मांसाहार करतो. आणि हो मांसाहार हा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. मग, हजारो वर्षांपासून आपली संसाधने जतन करणारी मंडळी अपवित्र झाली का? मुळात लाखो रुपयांची ‘बेहिशेबी’ मालमत्ता जतन करुन ठेवणारे ‘महाराज’ लोक्स अशी बिनबुडाचे सल्ले देतात आणि सामाजिक अंतर निर्माण करतात. आणि हो मीही वारकरी आहे. पण कोणी काय खावे? अथवा एखाद्याने मांसाहार करा म्हणून काही सांगितले म्हणून त्याला मी कसा ‘उद्धारक’ आहे म्हणून सल्ले देणे हे मी करीत नाही आणि हे कितपत योग्य ते सांगावे ?

सेंट्रल विस्टा प्रकल्पावरून राहुल गांधी यांची मोदींवर टीका

पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून शिवसेनेचा केंद्र सरकारला सवाल

आणि हो आमचा महाराष्ट्र हा मिळेल ती भाकरी खाऊन लोकांत प्रबोधन करणाऱ्या खऱ्या विद्रोही तुकोबांचा आहे. फुले, शाहू, आंबेडकरांचा आहे. ना की, तुकोबांच्या नावावर बेहिशोबी मालमत्ता जमा करणाऱ्यांचा.

चर्म रंगू लागे रोहिदासा संगे । कबीराचे मागे विणी शेले ॥३॥

सजन कसाया विकू लागे मांस। माळया सावंतास खूरपू लागे ॥४॥

भगवंताने रोहिदासाबरोबर कातडी रंगवली व कबीराच्या मागावर शले विणले. सज्जन कसायाला मांस विकण्याच्या कामी मदत केली. सावता माळयाबरोबर त्याने खुरपणी केली.

सार्थ तुकाराम गाथा (२०४७)

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी