33 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeराजकीयसंजय राऊत यांचा पुन्हा एकदा 'या' प्रकरणावरून मोदी सरकारवर हल्लाबोल

संजय राऊत यांचा पुन्हा एकदा ‘या’ प्रकरणावरून मोदी सरकारवर हल्लाबोल

टीम लय भारी

नवी दिल्ली:- दिल्लीत बुधवार (ता.28) केंद्र सरकार आणि पेगसाप्रकरणी विरोधात महाविकास आघाडीसह इतर 14 पक्षांची बैठक पार पडली. विशेष म्हणजे शिवसेना पहिल्यांदाच विरोधकांच्या बैठकीला उपस्थित राहिली होती. या बैठकीनंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. पेगासस प्रकरणावरून संजय राऊत यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. सरकार तीन तास देशासाठी आणि राष्ट्राच्या सुरक्षेसाठी द्यायला तयार नसेल तर या सरकारच्या हातात राष्ट्र सुरक्षित नाही, असा घणाघाती हल्ला संजय राऊत यांनी चढवला (Sanjay Raut attack on Modi government once again over Pegasus issue).

संजय राऊत म्हणाले, पेगाससवर चर्चा व्हावी. या चर्चेला पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनी संसदेत उपस्थित रहावं एवढीच आमची मागणी आहे. केवळ तीन तास सरकारने या चर्चेसाठी द्यावेत.

मुख्यमंत्र्यांकडून वाढदिवसानिमित्त काही अपेक्षा…

महाविकास आघाडीसह 14 पक्षांची दिल्लीत बैठक; ‘या’ प्रकरणावरून केंद्र सरकारला घेरणार

संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना पेगासस प्रकरणावरून पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधला. विद्यमान सरकारचा संसदीय लोकशाहीवर विश्वासच नाही. हे तुम्हाला सरकार सतेत आल्यापासून जाणवत असेल. संसद चालवणे ही सरकारची जबाबदारी असते. पण त्यांची ही इच्छा दिसत नाही. पेगाससच्या चर्चेबाबत विरोधकांची मागणी साधी आहे. चर्चेवेळी पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी उपस्थित राहावे. त्यानंतर न्यायालयीन चौकशी नेमायची का किंवा जेपीसी नेमायची का हा नंतरचा विषय आहे, असे राऊत म्हणाले (Sanjay Raut once again targeted the central government over the Pegasus issue).

देशासाठी मोदी सरकारकडे तीन तास नाहीत

पेगाससचा विषय राष्ट्रीय सुरक्षा, देशाची अंतर्गत सुरक्षा आणि नागरिकांचे स्वातंत्र्य याच्याशी संबंधित आहे. त्यामुळे इतर मंत्र्यांनी तिथे असण्याने त्याने फरक पडत नाही. पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी ते ऐकले पाहिजे. सरकार त्यापासून का पळ काढत आहे? इतक्या गंभीर विषयावर देशाचे गृहमंत्री आणि पंतप्रधान संसदेला तीन तास देऊ शकत नाही का? आम्ही फक्त तीन तास मागत आहोत. देशासाठी. आणि सरकार तीन तास देशासाठी आणि राष्ट्राच्या सुरक्षेसाठी द्यायला तयार नसेल तर या सरकारच्या हातात राष्ट्र सुरक्षित नाही, अशी टीका राऊत यांनी केली (Sanjay Raut said that Modi government does not have three hours for the country).

कुठे जाहीर मुस्कटदाबी आणि कुठे सोबत घेतलेले दोन घास, चित्रा वाघ यांचे कुत्सित ट्विट

Narendra Modi, Amit Shah have hit soul of democracy by using Pegasus against India, its institutions: Rahul Gandhi

संसद ठप्प राहावी ही सरकारची इच्छा

सरकारला संसद चालू द्यायची नाही. सरकार विरोधी पक्षावर ठपका ठेवत आहे. पण सरकारलाच गोंधळ निर्माण करायचा आहे. सरकारला पेगाससवर सत्य ऐकण्याची भिती वाटते. विरोधी पक्षाकडून त्यांना जे ऐकावे लागेल त्याबाबत त्यांच्या मनात धास्ती आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी सत्य ऐकण्याची तयारी ठेवली पाहिजे. पेगासस असेल, कृषी कायदे असेल… विरोधी पक्ष हा जनतेचा आवाज असतो. त्याचे ऐकणे लोकशाहीत प्रत्येक सरकारला बंधनकारक जरी असले तरी केंद्रातलं सरकार त्या संदर्भात सतत माघार घेताना दिसत आहे. सरकार या गोंधळास प्रवृत्त करत आहे. हा गोंधळ असाच राहावा आणि संसद ठप्प राहावी ही सरकारची इच्छा दिसते. त्याचे कुणी समर्थन करू नये, असे सांगतानाच अनेक प्रकारची विधेयक कोणतीही चर्चा न करता पास केली जात आहेत. सरकारला हेच हवे आहे. त्यामुळे सरकार पेगाससवर चर्चा करत नाही, असा आरोप राऊत यांनी केला आहे.

संजय राऊत यांचा पुन्हा एकदा 'या' प्रकरणावरून मोदी सरकारवर हल्लाबोल
शिवसेना नेते संजय राऊत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी

प्रत्येक बैठकीला तृणमूलचे नेते असतात

काल विरोधकांची बैठक झाली, यावेळी तृणमूलचे खासदार उपस्थित नव्हते. त्याबाबतही राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. संसदेत गोंधळ घालण्यात काँग्रेसच्या बरोबर तृणमूलचे खासदार होते. त्याचवेळी तृणमूलची बैठक होती, ते तिकडे गेले असतील. प्रत्येक बैठकीला तृणमूलचे नेते असतात, काल सकाळी होते आजही आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले  (Sanjay Raut is the Trinamool leader at every meeting).

भुवया का उंचावता

ममता बॅनर्जी आज केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना भेटणार आहेत. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. ममता बॅनर्जी यांचे शरद पवारांशी जिव्हाळ्याशी संबंध आहेत. उद्धव ठाकरेंशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध आहेत. नुसती भेट घेतली की भेट झाली यावर नाती टिकत नसतात. त्यांचे संबंध सर्वांशी चांगले आहेत. भेटीगाठी होत राहतात. अजून दोन दिवस आहेत त्या दिल्लीत. त्या गडकरींना भेटल्यातर तुम्हाला त्याची चिंता का? असा सवाल करतानाच राज्याच्या मुख्यमंत्री जेव्हा दिल्लीत येतात. तेव्हा आपल्या राज्यातील अनेक विकास कामांची जंत्री घेऊन येतात. गडकरींकडे महामार्ग रस्ते, पायाभूत सुविधा हे खातं आहे. बंगालमधील अशा कामासाठी त्या गडकरींना भेटत असतील तर मीडिया आणि राजकारण्यांना भुवया उंचावण्याचे काही कारण नाही, असे ते म्हणाले. ममता दीदी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटणार का मला माहीत नाही. पण जेव्हा ममतादीदी मुंबईत येतात तेव्हा त्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटतात, असे राऊत यांनी स्पष्ट केले आहे (Sanjay Raut said that when Mamata Banerjee comes to Mumbai, she meets Uddhav Thackeray).

नेता आणि चेहरा नंतर ठरवू

सर्वांनी एकत्र यावं, अशी ममतादीदींची इच्छा आहे. त्यांचं विधान ऐकलं. आधी एकत्र येऊ. काम करू. नेता आणि चेहरा नंतर ठरवू, असं त्या म्हणाल्या. त्यांच्या कामात त्यांना यश मिळो ही आमची सदिच्छा आहे, असं सांगतानाच नेता आणि चेहरा ठरवणं कठिण आहे हा तुमचा गैरसमज आहे. योग्य वेळ येताच एकमत होतं. गरजेतून आणि संकटातून असे चेहरे आणि नेतृत्व निर्माण होत असते, असेही राऊत यांनी सांगितले आहे (Sanjay Raut said that such faces and leadership are created out of need and crisis).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी