30 C
Mumbai
Tuesday, May 7, 2024
Homeराजकीयपहिल्याच दिवशी शेतकरी 'आत्महत्या' थांबवण्याचा शिंदे सरकारचा संकल्प

पहिल्याच दिवशी शेतकरी ‘आत्महत्या’ थांबवण्याचा शिंदे सरकारचा संकल्प

टीम लय भारी

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी काल संध्याकाळी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आज त्यांच्या कामकाजाचा पहिला दिवस होता. आज त्यांनी गोव्यामध्ये माध्यमांना पहिली प्रतिक्रिया दिली. आज कृषीदिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या मुक्त झाला पाहिजे यासाठी निर्णय घेतले जातील असा संकल्प केला.

शेतकरी आत्महत्या थांबल्या पाहिजेत, त्यासाठी जलयुक्त शिवार योजना आणखी सक्षम करण्याचे सूतोवाच नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिल्याच दिवशी केले. तसेच अनेक वर्षांपासून रखडलेले प्रकल्प कार्यान्वीत करण्यात येतील. यामध्ये रखडलेल्या मेट्रो प्रकल्पाची कामे देखील केली जातील, असेही ते यावेळी म्हणाले. तीन वर्षांपासून वादात सापडलेला मेट्रो कारशेड प्रकल्प पुन्हा आरेमध्ये आणला, जाईला असे कालच शिंदे सरकारने जाहिर केले. या प्रकल्पामुळे पुन्हा एकदा मोठी खडाजंगी होण्याची शक्यता आहे.

तसेच जास्तीतजास्त जमीन सिंचनाखाली येण्यासाठी प्रकल्प राबवण्यात येतील. मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यासाठी प्रयत्न करु. फडणवीस आणि मी जनतेच्या हिताचे निर्णय घेवू. आमचे शिवसेना भाजप युतीचे सरकार महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी प्रयत्न करेल, असे आश्वासन त्यांनी दिले. गोव्यात असलेले आमदार उद्या मुंबईत परत येणार आहेत. हे आमदार अधिवेशनात सहभागी होतील असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

माध्यमांशी संवाद साधल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईला परतणार होते. मुंबईत जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. दरवर्षी मुंबईत पावसाळ्यात पाणी तुंबण्याची समस्या निर्माण होते. कालच्या पावसात मुंबईतील अनेक भागात पाणी साचले होते. पावसाळ्यात नागरिकांचे हाल होवू नयेत यासाठी आज ते आपत्कालीन विभागातील अधिकारांची बैठक घेणार आहेत.

हे सुध्दा वाचा:

शिवसेनेच्या अनेक मंत्र्यांनी गद्दारी केली, पण एका मंत्र्यांने पद गेल्यानंतरही उद्धव ठाकरेंप्रती कृतज्ञता व्यक्त केली

रोहित पवारांनी एकनाथ शिंदेंना सांगितली महत्वाची कामे

सामान्य माणूस ‘मुख्यमंत्री‘ पदी विराजमान झाला

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी