32 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रव्याघ्र प्रकल्पातील बाधित स्थानिकांना घेऊन निसर्ग पर्यटनाच्या योजना

व्याघ्र प्रकल्पातील बाधित स्थानिकांना घेऊन निसर्ग पर्यटनाच्या योजना

टीम लय भारी

मुंबई : कोयना धरण परिसरातील तसेच व्याघ्र प्रकल्प बाधितांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. त्यांच्यासाठी अनेक योजना राबविण्यात येणार आहेत. याबाबत एका विशेष बैठकीचे आयोजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले होते. (Rehabilitation of Koyna Dam area as well as tiger project victims will be done)

स्थानिकांस रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात तसेच पर्यटनास चालना मिळावी या हेतूने या योजना राबवण्यात येतील असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्विट करून सांगितले.

अल्पवयीन मुली वर अत्याचार, माजी नगराध्यक्ष व शिवसेनेचे नेते डी एम बावळेकर यांच्या दोन पुत्रांचा गुन्ह्यांमध्ये समावेश

T -20 क्रिकेट वर्ल्डकप मध्ये तालिबान अफगाणिस्तानला खेळवणार? तालिबानची नरमाई परंतु घातली एक अट

कोयना प्रकल्पग्रस्तांच्या पाल्यांना महावितरणमध्ये प्राधान्यानं नोकरीच्या संधी उपलब्ध करुन द्याव्यात.तसंच कोयना प्रकल्पग्रस्त व सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील बाधित स्थानिकांना घेऊन निसर्ग पर्यटनाच्या योजना राबवण्यात याव्यात.या माध्यमातून तेथील प्रकल्पग्रस्तांना रोजगार उपलब्ध होईल. असे अजित पवार म्हणाले.

त्याच बरोबर जमिनी व्याघ्र प्रकल्पात संपादित झालेल्यांना त्याबाबतचे दाखले देण्यात येतील. मच्छिमारी, नौकाविहार, पर्यटनात प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य देण्यात येणार आहे. प्रकल्पग्रस्तांच्या जमीन वाटपासाठी कालबद्ध कार्यक्रम आखण्यात येईल, तसेच अतिरिक्त वाटप केलेल्या जमिनींची माहिती घेऊन पात्र प्रकल्पग्रस्तांना जमिनींचे वाटप होईल.

T -20 क्रिकेट वर्ल्डकप मध्ये तालिबान अफगाणिस्तानला खेळवणार? तालिबानची नरमाई परंतु घातली एक अट

Rehabilitation
व्याघ्र प्रकल्पातील बाधित स्थानिकांना घेऊन निसर्ग पर्यटनाच्या योजना

The Best Time For Rehabilitation After A Stroke Might Actually Be 2 To 3 Months Later

जमीन वाटपासाठी उपलब्ध जमिनीची माहिती संकलित करावी. प्रकल्पग्रस्त बांधवांना नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच कोयना धरण प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासह त्यांचे इतर प्रलंबित प्रश्न तातडीनं मार्गी लावण्याचे निर्देश या बैठकीत अजित पवारांनी दिले.

कोयना धरणासाठी बाधित झालेल्या कुटुंबांचा त्याग मोठा आहे. त्यामुळे कोयना धरणग्रस्त बांधवांना न्याय देण्यासाठी कोयना प्रकल्पग्रस्तांचे रजिस्टर प्रमाणित करावे, अशा सूचना त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना केल्या.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी