31 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeराजकीयरोहिणी खडसेंच्या वाहनावर अज्ञातांनी केली दगडफेक

रोहिणी खडसेंच्या वाहनावर अज्ञातांनी केली दगडफेक

टीम लय भारी

जळगाव: माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या तथा जिल्हा सहकारी बॅंकेच्या माजी अध्यक्षा रोहिणी खडसे यांच्या वाहनावर हल्ला झाला आहे. (Rohini Khadse’s vehicle pelted stones by unknown persons)

जळगाव चांगदेव येथून एका कार्यक्रमातून घरी येत असताना सूतगिरणी रस्त्यावर अज्ञातांनी हल्ला केला. रात्री 9:30 च्या सुमारास ही घटना घडील आहे. सोमवारी रात्रीच्या सुमारास रोहिणी खडसे यांच्या चारचाकी वाहनावर अज्ञातांनी दगडफेक केली, त्यानंतर रॉडने तोडफोड करण्यात आली. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे. रोहिणी खडसे या हल्ल्यातून सुखरुप बचावल्या आहेत.   रोहिनी खडसे यांच्या घरी पोलिस पोहचले आहेत. तेथे कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.

धनंजय मुंडे इन ऍक्शन मोड! विधानपरिषदेने पुन्हा अनुभवले जुने धनंजय मुंडे!

जितेंद्र आव्हाडांच्या मुलीचं मुंबईत रजिस्टर तर गोव्यात ख्रिश्चन पद्धतीने मुलीचं लग्न; स्पष्टीकरण देताना म्हणाले…

खडसे यांच्या गाडीवर हल्ला झाल्याचे समजताच राष्ट्रवादीच्या नेत्या तथा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी घटनेचा तीव्र निषेध केला आहे. तसेच अशा प्रकारचा हल्ला करणारे हल्लेखोर सुटता कामा नयेत, असेही त्या म्हणाल्या. मात्र या घटनेनंतर जळगावात एकच खळबळ उडाली आहे.

रोहिणी खडसे एका कार्यक्रमातून मुक्ताईनगरकडे येत असताना सूतगिरणी परिसरात दोन दुचाकींवरुन आलेल्या चार अज्ञात इसमांनी त्यांच्या वाहनावर हल्ला केला. यावेळी वाहन चालकाने प्रसंगावधान दाखवत कार रस्त्यावरून बाजूला नेली. चालकाने रोहिणी खडसे यांच्यासह शेतात पलायन केलं यामुळे सुखरूप बचावले.तसेच त्यांनी जळगाव पोलिस अधीक्षक यांच्याकडे हल्लेखोरांचा तपास करुन त्यांच्याविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

फडणवीस शाळेत जात होते तेव्हा भाजपचे दोनच खासदार होते; मलिकांचा टोला

Nawab Malik urges police to probe the death of actress who faced extortion

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी