30 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeराजकीयमहाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होईल म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांना शरद पवारांचा टोला; म्हणाले…

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होईल म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांना शरद पवारांचा टोला; म्हणाले…

 टीम लय भारी
मुंबई: राज्य सरकार स्थिर ठेवण्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे सहकरारी यशस्वी झालेत असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. तसंच यावेळी त्यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल असं म्हणणाऱ्या भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना शरद पवारांनी टोला लगावला आहे. नवीन वर्षात त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत असं शरद पवार म्हणाले आहेत.( Sharad Pawar’s attack on Chandrakant Patil)

रयत शिक्षण संस्थेच्या सातारा येथील छत्रपती शिवाजी कॉलेजच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनासाठी संस्थेचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार साता-यात आले होते. त्यावेळी त्यांच्यासमवेत खासदार श्रीनिवास पाटील आदी उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला.

Sharad Pawar : शरद पवार, बस नाम ही काफी है

दिल्लीत उदयनराजे भोसलेंनी घेतली शरद पवारांची भेट; तर्क-वितर्कांना उधाण!

 चंद्रकांत पाटील यांना राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल अशी शक्यता वर्तवली आहे असं सांगण्यात आलं असता ते म्हणाले की, “नवीन वर्षात त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. राज्यामध्ये, विधिमंडळात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली स्पष्ट बहुमत आहे.

राज्य सरकार स्थिर ठेवण्यात उद्धव ठाकरे आणि त्यांचे सहकारी यशस्वी झाले आहेत, त्यामुळे जे लोक अस्वस्थ असतात ते अशा प्रकारची विधानं करत असतात,” असा टोला शरद पवारांनी लगावला.

दिल्लीत आज पुन्हा सोनिया, पवार, राऊतांची बैठक, नेमका अजेंडा काय?

‘There is no UPA alliance’, says Mamata Banerjee after meeting Sharad Pawar to discuss 2024 LS Polls

“त्यांनी याआधीही अशा प्रकारची विधानं केली आहेत. त्याची नोंद महाराष्ट्रात सामान्य लोक घेत नाहीत. त्याचा काही फायदा होत नाही. त्यामुळे त्यावर अधिक भाष्य करण्यास इच्छुक नाही,” असं सांगत त्यांनी जास्त महत्व देण्यास नकार दिला.

विधानसभा अध्यक्षपदासाठी राज्यपालांनी दोन वेळा निवडणुकीच्या तारखा दिल्यानंतरही महाविकास आघाडी सरकारने निवडणूक घेतली नाही हा राज्यपालांचा आणि घटनेचा अवमान आहे आणि याच एका मुद्द्यावर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकते असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी