31 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeराजकीयरोहित पवारांनी राज्यपाल कोश्यारी यांच्यावर साधला निशाणा

रोहित पवारांनी राज्यपाल कोश्यारी यांच्यावर साधला निशाणा

टीम लय भारी

मुंबई:- आमदार रोहित पवार राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. राज्य शासनाने तुम्हाला MPSC च्या सदस्यांच्या यादी पाठवली आहे, विधान परिषद आमदारांची नाही, असे म्हणत रोहित पवार यांनी राज्यपालांवर निशाणा साधला आहे (Rohit Pawar targeted Governor Bhagat Singh Koshyari).

ट्विटरवर विकास भारती नावाच्या एका युजर्सने 31 जुलै च्या आधी एमपीएससी आयोगातील सदस्य भरणार होते, काय झाले? असे सवाल विचारणारे ट्विट कले. त्या युजर्सच्या प्रश्नाला उत्तरे देणारे ट्विट रोहित पवार यांनी केले. ज्यातून 31 जुलै पूर्वीच राज्यपाल महोदयांकदे सदस्यांची यादी पाठवली असल्याचे त्यांनी सांगितले.

“आमचा सीएम जगात भारी”, मुख्यमंत्र्यांवर मनसेचा खोचक पण मजेशीर टोला

Video : खासदार नवनीत राणा यांचा असाही साधेपणा

Rohit Pawar targeted Governor Bhagat Singh Koshyari
रोहित पवार आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

माननीय अजितदादा हे शब्द पाळणारे नेते आहेत. MPSC च्या सदस्यांच्या रिक्त जागा भरण्यासाठी सरकारने 31 जुलै पूर्वीच राज्यपाल महोदयांकडं सदस्यांची यादी पाठवलीय. ती विधान परिषदेच्या आमदारांची यादी नसल्याने महामहीम राज्यपाल महोदय तातडीने मंजूर करतील, असा विश्वास आहे. असे ट्विट करत रोहित पवार यांनी राज्यपालांना टोला लगावला आहे.

संजय राऊतांचा शिवसेना भवनावर बोलणाऱ्यांना इशारा; स्वत:च्या पायावर याल, पण जाताना…

Mumbai: State begins filling up 15,500 vacant posts through MPSC

ठाकरे सरकारने विधान परिषदेसाठी 12 आमदारांची यादी महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवली आहे., परंतु कित्येक महिने उलटून गेली तरी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ती यादी मंजूर केलेली नाही. हाच धागा पकडून रोहित पवार यांनी राज्यपालांना चिमटा काढला (Rohit Pawar tweaked the governor).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी