टीम लय भारी
मुंबई : राज्यात कोरोनाचा वेग मंदावला असताना राज्याचे गृहमंत्री मंत्री दिलीप वळसे पाटील कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. स्वतः गृहमंत्र्यांनी ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे. दिलीप वळसे पाटील यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरु आहेत (State Home Minister Dilip Walse Patil once again tested corona positive).
‘कोरोना सदृश्य लक्षणे दिसत असल्यामुळे मी माझी कोरोना टेस्ट केली असता माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझी प्रकृती स्थिर असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय उपचार सुरु आहेत.’ असे दिलीप वळसे पाटील यांनी ट्विट करत लिहिले आहे.
मुंबई पोलीस आयुक्तांनी घेतली गृहमंत्र्यांची भेट, समीर वानखेडेंवर होणार गुन्हा दाखल?
समीर वानखेडेंच्या आरोपांवर गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांचं स्पष्टीकरण
कोरोना सदृश्य लक्षणे दिसत असल्याने मी माझी टेस्ट केली असून माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. प्रकृती स्थिर असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय उपचार सुरू केले आहे.
— Dilip Walse Patil (@Dwalsepatil) October 28, 2021
नागपूर व अमरावती दौऱ्यादरम्यान तसेच इतर कार्यक्रमाप्रसंगी माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना माझे आवाहन आहे की, त्यांना लक्षणे आढळून आल्यास कोरोना टेस्ट करून घ्यावी. शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे व कोरोना नियमांचे काटेकोर पालन करावे.
— Dilip Walse Patil (@Dwalsepatil) October 28, 2021
तसेच वळसे पाटील यांनी नागपूर आणि अमरावती दौऱ्यावर झालेल्या कार्यक्रमात त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना कोरोना टेस्ट करण्याचे आवाहन केले आहे. कोरोना लक्षणे दिसल्यास लगेचच कोरोना टेस्ट करावी करावी. त्याचबरोबर शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे व कोरोना नियमांचे पालन करावे असे ही आवाहन पाटील यांनी केले आहे.
दिलीप वळसे पाटील यांनी जयंत पाटील यांचे मानले आभार
Maharashtra Home Minister Dilip Walse Patil tests positive for Covid-19 second time in one year