33 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeराजकीयशिवसेनेच्या अनेक मंत्र्यांनी गद्दारी केली, पण एका मंत्र्यांने पद गेल्यानंतरही उद्धव...

शिवसेनेच्या अनेक मंत्र्यांनी गद्दारी केली, पण एका मंत्र्यांने पद गेल्यानंतरही उद्धव ठाकरेंप्रती कृतज्ञता व्यक्त केली

टीम लय भारी

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात आजवर अनेक पक्षांमध्ये बंडखोरी करण्यात आली. पण महाविकास आघाडी सरकारच्या आमदारांनी केलेली बंडखोरी ही एका चित्रपटाला साजेशी अशी कथा आहे. विधान परिषद निवडणूक झाल्यानंतर शिवसेनेचे जवळजवळ सर्वच आमदार विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले. पण शिवसेनेचे काही आमदार असेही होते, ज्यांनी शिवसेनेशी गद्दारी केली नाही.

शिवसेनेचे नेवासा विधानसभेचे आमदार शंकरराव गडाख यांनी शेवटच्या क्षणापर्यंत शिवसेनेला साथ दिली. इतर सर्व आमदारांनी शिवसेना पक्षाला घटस्फोट दिल्यानंतर देखील शंकरराव गडाख हे शिवसेनेसोबतच राहिले. महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर सर्व मंत्र्यांना पदावरून पायउतार व्हावे लागले. याबाबतची पोस्ट महाविकास आघाडीच्या काही मंत्र्यांकडून करण्यात आली. माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणारी अशीच एक पोस्ट माजी मृद व जलसंधारण विभागाचे मंत्री शंकरराव गडाख यांनी ट्विटरला लिहिली आहे.

या पोस्टमध्ये शंकरराव गडाख यांनी लिहिले आहे की, ‘शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवजी ठाकरे साहेब यांनी दाखवलेल्या विश्वासामुळे मला राज्याचा मृद व जलसंधारण विभागाचा मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. मंत्रीपदाच्या काळात अनेक महत्वाची कामे झाली. त्यात शेतकऱ्यांची कर्जमाफी व शेतकऱ्यांच्या हिताची… जलसंधारण विभागात मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना ही नवीन योजना सुरू करून राज्यात प्रभावीपणे राबवली. माननिय उध्दवजी ठाकरे साहेब व मंत्रीमंडळातील माझे सहकारी, प्रशासनातील आधिकारी व माझ्या मतदारसंघातील व राज्यातील जनतेचा मी आभारी आहे. धन्यवाद.’

हे सुद्धा वाचा :

रोहित पवारांनी एकनाथ शिंदेंना सांगितली महत्वाची कामे

आपल्या पोरा-बाळांना उद्धव ठाकरेंचे शेवटचे भाषण दाखवा : संजय आवटे

शरद पवार म्हणाले, शपथ घेताना देवेंद्र फडणविसांचा चेहरा नाखूष होता

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी