32 C
Mumbai
Wednesday, May 8, 2024
Homeमहाराष्ट्ररोहित पवारांनी एकनाथ शिंदेंना सांगितली महत्वाची कामे

रोहित पवारांनी एकनाथ शिंदेंना सांगितली महत्वाची कामे

टीम लय भारी

मुंबई : २० जूनला राज्यात विधान परिषदेच्या निवडणुका पार पडल्या आणि महाराष्ट्रात सत्तानाट्याला सुरुवात झाली. शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर महाराष्ट्रातील महाविकास आघडीचे सरकार अस्थिर झाले. शिवसेनेच्या सर्व बंडखोर आमदारांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना त्यांच्या मुख्यमंत्री पदावरून पायउतार होण्यास देखील भाग पाडले. त्यानंतर ३० जून रोजी अखेर या सत्तानाट्याला पूर्णविराम लागला आणि बंडखोर आमदारांचे नेते एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या पाठिंब्याने मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी मराठीमध्ये ट्विट करून शुभेच्छा दिलाय. याचवेळी विरोधी गटातील शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील शुभेच्छा दिला. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी दिलेल्या शुभेच्छा यावेळी चर्चेचा विषय ठरत आहेत. रोहित पवार यांनी शुभेच्छा देण्यासोबतच कामाचा पाढा वाचून दाखविला आहे.

रोहित पवार यांनी एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा देताना म्हंटले आहे की, ‘राज्याचे नूतन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचं मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा! महाराष्ट्राचं पुरोगामित्व कायम ठेवून कोणताही भेदभाव न करता सर्व घटकांना सोबत घेऊन महाराष्ट्र विकासाच्या मार्गावर असाच धावत रहावा, यासाठी आपण प्रयत्न कराल, ही अपेक्षा! तसंच राज्याचे केंद्राकडं अडकलेले #GST चे पैसे आणणं, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणं, मुंबई मेट्रोशेडसाठी पर्यायी जागा मिळवणं, मराठा-धनगर-ओबीसी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणं आदी विषयांबाबत निर्णय घेण्यास आपण भाजपला भाग पाडाल, असा विश्वास आहे!’

एकंदरीतच, महाविकास आघाडीचे सरकार असताना, भाजपकडून वेळोवेळी या कामासाठी गदारोळ केला जायचा. ही कामे आघाडी सरकार कशी पूर्ण करत नाहीत. याबाबत त्यांच्याकडून वारंवार सांगितले जायचे. त्यामुळे आता भाजपच्याच पाठिंब्याने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्याने सदर कामे पूर्ण होतील, अशी आशा व्यक्त करत रोहित पवारांनी शुभेच्यांमार्फत मुख्यमंत्री शिंदेंना टोलेबाजी लगावली आहे.

हे सुद्धा वाचा :

आपल्या पोरा-बाळांना उद्धव ठाकरेंचे शेवटचे भाषण दाखवा : संजय आवटे

शरद पवार म्हणाले, शपथ घेताना देवेंद्र फडणविसांचा चेहरा नाखूष होता

हो !राजकारणात काहीही घडू शकतं

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी