31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeटॉप न्यूजशिवजयंतीनिमित्त सादिया सय्यद छत्रपती शिवाजी महाराजांना देणार अनोखी मानवंदना

शिवजयंतीनिमित्त सादिया सय्यद छत्रपती शिवाजी महाराजांना देणार अनोखी मानवंदना

टीम लय भारी

मुंबई : सादिया सलीम सय्यद ही एक धावपटू असून तिने अनेक विक्रम गाजवले आहे. सादिया ही मुळची बारामतीची असुन मुंबईतील एका बँकेत नोकरी करते. मात्र यंदाच्या शिवजयंतीनिमित्त ती मुंबई ते पुणे असा प्रवास करून छत्रपती शिवाजी महाराज यांनी अनोखा मुजरा प्रदान करणार आहे असे समोर आले आहे(Shiva Jayanti, Sadia Sayyed will pay a unique tribute to Shivaji Maharaj).

येत्या शनिवारी (19 फेब्रुवारी) छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे. या शिवजयंतीनिमित सादीया असा एक अनोखा उपक्रम आपल्या अंगी झेपवणार आहे. अनेक जण शिवजयंतीच्या निमित्तानं विविध कार्यक्रमाचे आयोजन करतात. पण सादीया सलीम सय्यद ही शिवजयंती निमित्त मुंबई ते पुणे असा प्रवास करून यातून छत्रपती शिवाजी महाराज यांना अनोखा मुजरा करणार आहे.

सादीया सलीम सय्यद ही महिला धावपटू शिवजयंतीच्या निमित्ताने मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया ते पुण्यातील लाल महालापर्यंत धावणार आहे. शुक्रवारी पहाटे तीन वाजता तिच्या या महा मॅरेथॉन रनला सुरुवात होणार असून शनिवारी शिवजंतीच्या दिवशी ती पुण्यातील लाल महालात पोहचणार आहे, असे तिने म्हंटले आहे. आणि हे अंतर अंतर जवळपास 165 किलोमीटरचे असून या दरम्यान वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळे धावपटू तिला साथ देखील देणार आहे.

बारामती स्पोर्ट फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. आणि या मॅरेथॉन ला डीसीपी राज टिळक रोशन यांनी या मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवला.

हे सुद्धा वाचा

शिवजयंती साजरी करण्यास मुख्यमंत्री दिली मान्यता, ‘या’ अटींची करावी लागणार पुर्तता

लवकरच राज्यातील विद्यार्थ्यांना ‘समान संधी केंद्राचा’ मिळणार लाभ

Shivaji Maharaj Jayanti 2022: History, significance and celebrations 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी