35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeराजकीयराजकारणापेक्षा जावलीच्या विकासाला नेहमीच प्राधान्य : आमदार शिवेंद्रसिंहराजे

राजकारणापेक्षा जावलीच्या विकासाला नेहमीच प्राधान्य : आमदार शिवेंद्रसिंहराजे

टीम लय भारी

सातारा : मी कोणत्याही पक्षात असलो तरी विकासकामांत कुठेही अडचण आलेली नाही आणि कधी येणारही नाही. जे लोक तालुक्यात कार्यरत आहेत, तुमच्या सुखदुखात तुमच्या सोबत आहेत त्यांच्या बरोबर, त्यांच्या पाठीशी ठाम राहा. मृगजळ बनून बाहेरून येणाऱ्यांच्या पाठीमागे धावू नका. राजकारणापेक्षा जावलीच्या विकासाला कायम प्राधान्य दिले असून जावलीतील जनतेला सोडून मी कधीही जाणार नाही, असा शब्द आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिला (Shivendra Singh Raje Development of Jawali always priority over politics).

सर्जापुर ग्रामपंचायतीच्या नुतन बहुउद्देशीय इमारतीचे भूमीपूजन तसेच बर्गे वस्ती रस्ता खडीकरण, सटवाई रोडचे डांबरीकरण व लसीकरण कँम्पचे उदघाटन अशा विविध विकासकामांचे भूमीपूजन व उदघाटन आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे बोलत होते.

पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीने कर्मचाऱ्यांच्या आणि जनतेच्या डोळ्यात अश्रू

एसटी महामंडळाच्या मदतीला अजित पवार आले धावून

या कार्यक्रमात जावलीचे उपसभापती सौरभ शिंदे, माजी सभापती अरूणा शिर्के, जयदिप शिंदे, प्रकाश मोहिते, सरपंच स्वागता बोराटे, उपसरपंच शंकर मोहिते, देविदास बोराटे, मयुर बाबर, सारिका मोहिते, सुरेखा मोहिते, मनिषा बोराटे यांच्यसह ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या.

अरूणिता कांजीलाल व पवनदीप राजन यांचा रोमँटिक व्हिडिओ व्हायरल…

Leaked CBI report giving clean chit to Anil Deshmukh is genuine: NCP

गेल्या 12 वर्षापासून जावलीच्या जनेतेसाठी मी झटत आहे. विकासकामांत मी कधीच सातारा जावली असा भेदभाव केला नाही व कधी करणारही नाही. विकासकामांबरोबरच तालुक्यातील सर्व अडचणी सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न सातत्याने केला आहे. तुमच्या सर्व अडचणी सोडवण्यासाठी मी कायम तत्पर असून जो खऱ्या अर्थाने तुमची कामे करतो त्याच्या पाठीशी कायम रहा, असे आवाहन त्यांनी केले. अतुल बोराटे यांनी सुत्रसंचालन केले. नितिन मोहिते यांनी प्रास्ताविक केले. किर्तनकार नलावडे यांनी आभार मानले (Kirtankar Nalawade thanked).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी