31 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeराजकीयआमदार मनिषा कायंदेंचा टोला, स्टंटबाज नेते किरीट सोमय्या सपशेल आपटले

आमदार मनिषा कायंदेंचा टोला, स्टंटबाज नेते किरीट सोमय्या सपशेल आपटले

टीम लय भारी

मुंबई : एका चहावाल्याला कोविड सेंटरचा कॉन्ट्रॅक्ट दिल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. यावरून आता शिवसेनेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी सोमय्या यांच्यावर निशाणा साधला आहे. सोमय्यांचा हा हास्यास्पद प्रयत्न असल्याचे त्यांना म्हटले आहे(Shivsena MLA Manisha Kayande lashes out Kirit Somaiya).

मनिषा कायंदे म्हणाल्या, ‘पुण्याच्या कोविड सेंटर वरुन भारतीय जनता पार्टीचे स्टंटबाज नेते किरीट सोमय्या यांनी एक वादळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यामध्ये ते सपशेल आपटले. आता त्यांचा मुद्दा काय की, याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला आणि कुठलीही पारदर्शकता नाही. कोविड काळामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जे काम केलं, ते सर्व जगाने त्याचं कौतुक केलं. सर्वोच्च न्यायालयाने त्यांचे कौतुक केले आणि त्यामध्ये जी पारदर्शकता ठेवली, त्याचं देखील सगळ्यांनी कौतुक केलंय. असं असताना मात्र भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना सतत पोटदुखी होते, मळमळ होतेय, डोकेदुखी होतेय आणि एवढंच नव्हे तर त्यांचं मानसिक संतुलन देखील बिघडलंय.’

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती करत त्या म्हणाल्या की, ‘कृपा करुन भारतीय जनता पार्टीच्या या नेत्यांना कोविड सेंटर मध्ये भरती करावं. त्यांच्यावर इलाज करावा आणि नुसताच शारीरिक इलाज नाही तर त्यांच्यावर मानसिक इलाज करायची पण गरज आहे.’

हे सुद्धा वाचा

‘पेगॅसस’ च्या मुद्द्यावरुन शिवसेनेचा मोदी सरकारवर हल्लाबोल

किरीट सोमय्यांच्या सूड बुद्धीने माझ्यावर कारवाई, प्रताप सरनाईकांचा आरोप

दिल्लीच्या राजकारणापुढे महाराष्ट्र कधी झुकला नाही : संजय राऊत

Shiv Sena To Contest All Future Elections In Goa: Aaditya Thackeray

‘आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी कधीकाळी चहा विकत होते, मग त्यांच्यावर यांचा आक्षेप आहे का? मग एखाद्या चहावाल्यानी काही दुसरं काम करु नये का? या सगळ्याच गोष्टी हास्यास्पद आहेत. तसंही किरीट सोमय्या यांना कोणीही सिरीयसली घेत नाहीत त्याच्यामुळे काल त्यांनी जो काही पुण्यामध्ये तमाशा केला, तो अक्षरश: हास्यास्पद आणि दयनीय आहे.’ असे म्हणत मनिषा कायंदे यांनी किरीट सोमय्या यांना फटकारले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी