29 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeमहाराष्ट्रवाजपेयींचा व्हिडीओ शेअर करत, जयंत पाटलांनी दिल्या नेहरूंच्या स्मृतीदिनाच्या शुभेच्छा; पाहा कारण

वाजपेयींचा व्हिडीओ शेअर करत, जयंत पाटलांनी दिल्या नेहरूंच्या स्मृतीदिनाच्या शुभेच्छा; पाहा कारण

टीम लय भारी

मुंबई :-  भारतीय स्वातंत्रता संग्रामचे महान सेनानी, स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा आज स्मृतिदिन आहे. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या स्मृतीदिनाच्या शुभेच्छा देत, अटलबिहारी वाजपेयींचा व्हिडीओ शेअर केला आहे (Water Resources Minister Jayant Patil wishes Pandit Jawaharlal Nehru Memorial Day, shares video of Atal Bihari Vajpayee).

गेल्या काही वर्षांत पंडित जवाहरलाल नेहरू (Pandit Jawaharlal Nehru) यांच्या बदनामीची एक शिस्तबद्ध मोहीम या देशात एका विशिष्ट वर्गाकडून चालवली जात आहे. परंतु या वर्गाकडून पंडित नेहरूंची (Pandit Nehru) उंची कितीही कमी करायचा प्रयत्न केला, तरीही ती कमी होणार नाही. पंडित जवाहरलाल नेहरू (Pandit Jawaharlal Nehru) यांचा कायमच या देशामध्ये सन्मान होत राहिला आहे. तसेच यापुढे ही होत राहील, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी पंडित जवाहरलाल नेहरुंना (Pandit Jawaharlal Nehru)  अभिवादन केले.

प्रविण दरेकरांनी ट्विट डिलीट केलं का? स्क्रीनशॉट शेअर करत सचिन सावंतचा सवाल

प्रियांका गांधीची लसीवरून केंद्र सरकारवर बोचरी टिका

Ordinary WhatsApp users have nothing to fear about new social media rules, says Ravi Shankar Prasad

अटल बिहारी वाजपेयींचे भाषण

पंडित जवाहरलाल नेहरू (Pandit Jawaharlal Nehru) यांचे निधन झाले, त्यावेळी अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) हे या देशाच्या संसदेचे सदस्य होते. “भय व भूकमुक्त जगाचे एक स्वप्न उध्वस्त झाले असून, भारतमाता आज शोकाने भरून गेली आहे, भारतमातेने तिचा आवडता राजकुमार आज गमावला आहे. जागतिक शांततेचा पुरस्कार करणारा संरक्षक आता आपल्यात नाही. सूर्यास्त झाला असून आपल्याला आपला रस्ता शोधायला हवा. जरी आमच्यामध्ये मतभेद असले तरीही आम्हाला पंडितजींची आदर्श मूल्ये, देशाप्रतीचे प्रेम आणि असीम धैर्याबद्दल केवळ आदरच आहे, असे अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांनी एका भाषणात म्हटले होते.

जयंत पाटलांचा भाजपला चिमटा

जयंत पाटील (Jayant Patil) यांनी या भाषणाची आठवण करुन देत भाजपाला चिमटा काढला आहे. 1999  मध्ये अविश्वास ठरावाच्या वेळी देखील पंडित नेहरू (Pandit Nehru) यांचा गौरवपूर्ण उल्लेख अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांनी आपल्या भाषणात केला होता. ते भाषण सोबत व्हिडिओ स्वरूपात आहे. यातूनच पंडित नेहरूंची (Pandit Nehru) महानता लक्षात येते, असे जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले.

पंडित जवाहरलाल नेहरू (Pandit Jawaharlal Nehru) यांनी कायमच आपल्या विरोधी विचारांचा आदर केला. तसेच लोकशाही मूल्यांना कधीही तडा जाऊ न देता संसदेला सर्वोच्च मानले. स्वतंत्र भारताची पायाभरणी पंडित जवाहरलाल नेहरू (Pandit Jawaharlal Nehru) यांनी केली. ते एक व्यक्ती म्हणून, स्वातंत्र्यसैनिक म्हणून तर महान होतेच. पण या देशाचे पहिले पंतप्रधान म्हणून या देशाच्या उभारणीत सर्वोच्च वाटा पंडित जवाहरलाल नेहरूंचा (Pandit Jawaharlal Nehru) आहे, असा टोलाही जयंत पाटील (Jayant Patil) यांनी लगावला. पंडित जवाहरलाल नेहरू (Pandit Jawaharlal Nehru) यांच्या स्मृतीदिनानिमित्त जयंत पाटील (Jayant Patil) यांनी अभिवादन केले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी